JioFinance App Sakal
Personal Finance

Jio Financial Services: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने लाँच केले JioFinance ॲप; ग्राहकांना मिळणार मोठ्या ऑफर्स

राहुल शेळके

JioFinance App: रिलायन्स इंडस्ट्रीजची वित्तीय कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने नवीन जिओ फायनान्स ॲप लाँच केले आहे. ग्राहक हे ॲप Google Play Store, Apple App Store आणि MyJio वरून डाउनलोड करू शकतात. Jiofinance ॲपने ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. कंपनीने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

शुक्रवारी 11 ऑक्टोबर, 2024 रोजी बाजार उघडण्यापूर्वी, Jio Financial Services ने स्टॉक एक्सचेंजला त्यांच्या नियामक फाइलिंगमध्ये कळवले की, कंपनीने एक नवीन आणि सुधारित JioFinance ॲप लॉन्च केले आहे.

ज्याची बीटा आवृत्ती 30 मे 2024 रोजी लॉन्च करण्यात आली होती. कंपनीने सांगितले की, 6 दशलक्ष ग्राहकांनी Jio Financial Services Limited च्या या नव्या युगातील डिजिटल प्लॅटफॉर्मचा अनुभव घेतला आहे. ग्राहकांच्या अभिप्रायानंतर कंपनीने ॲपमध्ये सुधारणा केली आहे.

बीटा आवृत्ती लाँच केल्यानंतर, JioFinance ॲपमध्ये विविध वित्तीय उत्पादने आणि सेवा जोडल्या गेल्या आहेत ज्यात म्युच्युअल फंडांवर कर्ज, गृह कर्ज आणि मालमत्तेवर कर्ज यांचा समावेश आहे. ही कर्जे अतिशय आकर्षक असून ग्राहकांची मोठी बचत होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने सांगितले की, Jio Payment Bank Limited वर फक्त 5 मिनिटांत डिजिटल बचत खाते उघडता येते. कंपनी बायोमेट्रिक आणि डेबिट कार्डद्वारे सुरक्षित बँक खाती ऑफर करत आहे. 1.5 दशलक्ष ग्राहक Jio Payment Bank Limited वापरत आहेत. याशिवाय UPI पेमेंट, मोबाईल रिचार्ज, क्रेडिट कार्ड बिल देखील भरत आहेत.

JioFinance ॲपवर ग्राहक त्यांचे सर्व म्युच्युअल फंड होल्डिंग्स आणि त्यांच्या विविध बँकांमधील होल्डिंग्स पाहू शकतील, जेणेकरून ते त्यांचे आर्थिक व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील.

याशिवाय कंपनी जीवन, आरोग्य, दुचाकी आणि मोटार विमा डिजिटल पद्धतीने देत आहे. कंपनीने सांगितले की, जिओ फायनान्शिअल ब्लॅकरॉकच्या सहकार्याने जागतिक दर्जाच्या गुंतवणूक सुविधांवर काम करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandurbar Vidhan Sabha Election 2024: नवापुरात तिन्ही उमेदवारांमध्येच रंगणार लढत; उमेदवार तेच, मात्र पक्ष व चिन्ह बदलण्याची शक्यता

टीम इंडियाला Semi Final गाठण्यासाठी शेवटची संधी; पाकिस्तानची हवीय मदत, जाणून घ्या समीकरण

Amitabh Bachchan : कुली सेटवरील 'त्या' घटनेनंतर अमिताभ साजरा करतात दोनदा वाढदिवस, हनुमान चालीसेने वाचवलेले प्राण

Ladki Bahin Yojana : धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात 9 लाख `लाडक्या बहिणी`; 30 हजार महिला आधारकार्ड `लिंकिंग`अभावी वंचित

Noel Tata: टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड; 'टाटा सन्स'मध्ये 66 टक्के मालकी

SCROLL FOR NEXT