Job Opportunities Sakal
Personal Finance

Job Opportunities: आनंदाची बातमी! देशभरात 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार; कोणत्या क्षेत्रात आहे संधी?

राहुल शेळके

Job Opportunities: देशातील गिग वर्कर्सच्या संख्येबाबत एक अहवाल आला आहे. यात सणासुदीच्या काळात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात असे सांगितले आहे. अनेक उद्योगांमध्ये गिग वर्कर्ससाठी नोकरीच्या संधी असू शकतात आणि यामध्ये अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.

किरकोळ, हॉटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) मध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

गिग वर्कर्स म्हणजे संघटित उद्योग किंवा संघटित क्षेत्रात कायमस्वरूपी कामगार म्हणून काम करत नाहीत. परंतु ते कामगार वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या करतात. आजकाल, तुमच्या आजूबाजूला दिसणारे बहुतांश कामगार हे क्विक कॉमर्स किंवा ऑनलाइन डिलिव्हरी पार्टनरच्या रूपात आहेत.

10 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता

नोकऱ्यांच्या बाबतीत हा अहवाल एनएलबी सर्व्हिसेस या मानव संसाधन कंपनीने समोर आणला आहे. या माध्यमातून यंदाच्या सणासुदीच्या काळात सुमारे 10 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

डिसेंबरपर्यंत विशेष सणासुदीचा हंगाम असेल आणि या काळात रिटेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नियुक्त्या होतील. वेअरहाऊस कर्मचारी, इन्व्हेंटरी मॅनेजर, लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर, किराणा कामगार आणि डिलिव्हरी ड्रायव्हर्ससाठी नोकरीच्या मोठ्या संधी असतील.

सणासुदीचा हंगाम, हिवाळा आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी, गिग डिलिव्हरी चालकांसाठी 30 टक्के अधिक नोकऱ्या आणि कामाच्या संधी निर्माण केल्या जातील. यामध्ये सर्वाधिक मागणी पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन वितरण भागीदारांची आवश्यकता असेल.

या फक्त तात्पुरत्या नोकऱ्या असतील की कायम?

एनएलबीच्या अहवालाचा हवाला देत इकॉनॉमिक टाईम्सने लिहिले आहे की, सर्व रोजगार निर्मितीपैकी 70 टक्के नोकऱ्या रोजगारांच्या हंगामी मागणीच्या स्वरूपात निर्माण केल्या जातील. 30 टक्के नोकऱ्या असतील ज्या कायमस्वरूपी नोकऱ्यांच्या स्वरूपात असतील आणि त्यांची नियुक्ती अधिक स्थिर नोकऱ्यांच्या स्वरूपात असेल.

महिलांचे प्रमाण जास्त असेल

विशेष म्हणजे या प्रकारच्या गिग वर्किंगमध्ये महिलांचा सहभाग अधिक असेल. अहवालानुसार, एकूण नोकरी शोधणाऱ्यांमध्ये त्यांची संख्या सुमारे 35 टक्के असेल. याचे एक कारण म्हणजे ऑनलाइन नोकऱ्यांपासून ते ब्रँडच्या जाहिरातीपर्यंत महिलांना अधिक नोकऱ्या देण्याचा ट्रेंड फार पूर्वीपासून सुरू आहे.

आजकाल ब्यूटी आणि ग्रूमिंग, ऑनलाइन शिकवण्या, घरगुती मदत, कॅब ड्रायव्हिंग इत्यादी सर्व गोष्टींपर्यंत ते फूड डिलिव्हरी करण्यासाठी महिलांचा सहभाग वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansabha Election : कल्याण पश्चिमेत मशाल तळपणार... शिंदेंच्या शिवसेनेतून ठाकरेंकडे गेलेल्या नेत्याचा कल्याण पश्चिमेवर दावा

Rohit Sharma ची पळापळ! Mumbai Indians च्या ग्राऊंडवर सरावासाठी गेला होता, पण... Video Viral

Rohit Sharma ने मुंबईच्या रस्त्यावर अचानक गाडी थांबवली अन् चाहतीला केलं 'बर्थ डे विश'; Video Viral

Garba Night: गरबा खेळताना हार्ट अटॅक येऊ शकतो का? वाचा डॉक्टर काय सांगतात

US Jobs: अमेरिकेत 87 लाख लोक एकपेक्षा जास्त नोकऱ्या करत आहेत; देशात नेमकं काय घडतयं?

SCROLL FOR NEXT