Kerala Budget 2024 doors open for private investment 3 lakh crore investment over next three years  Sakal
Personal Finance

Kerala Budget 2024: केरळचा मोठा निर्णय! खाजगी गुंतवणुकीसाठी दरवाजे केले खुले; अर्थसंकल्पात 'या' मुद्द्यांवर भर

राहुल शेळके

Kerala Budget 2024-25: केरळचे अर्थमंत्री के. बालगोपाल यांनी सोमवारी विधानसभेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बालगोपाल म्हणाले की, पुढील तीन वर्षांत 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याची राज्य सरकारची योजना आहे. ते म्हणाले की, केरळ देशात आघाडीवर आहे आणि सातत्याने पुढे जात आहे.

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी केंद्राच्या आर्थिक धोरणांना आणि दक्षिणेकडील राज्याच्या आर्थिक समस्यांसाठी केरळकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. बालगोपाल यांच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पाने केरळला गंभीर आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी खाजगी गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडले आहेत.

केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले, "केरळ एक मोठे पाऊल उचलण्यासाठी काही आउट-ऑफ-द-बॉक्स कार्यक्रम आणण्याची योजना आखत आहे.

आम्ही 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचा विचार करत आहोत. "आम्ही आशावादी आहोत. तसेच पर्यटन, विझिंजम बंदर, कोची बंदर आणि कोची इंडस्ट्रियल कॉरिडॉर यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे"

अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी सोमवारी आपला चौथा आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी केरळ राज्याला सूर्योदयाची अर्थव्यवस्था म्हणून संबोधले आहे.

अर्थमंत्री म्हणाले की, "सूर्योदय क्षेत्रांची व्याख्या तंत्रज्ञानातील भविष्यवादी प्रगती, मागणीत होणारी वाढ आणि परिणामी आर्थिक विकासाद्वारे केली जाते. ''

अर्थसंकल्पात 1,38,655 कोटी रुपयांचा महसूल आणि 1,84,327 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 27,846 कोटी रुपयांची महसुली तूट आहे, जी राज्याच्या जीडीपीच्या 2.12 टक्के आहे. वित्तीय तूट 44,529 कोटी रुपये आहे, जी जीडीपीच्या 3.4 टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट, तर मुंबईसह पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, वाचा 26 सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?

Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

Pune Rain : नरेंद्र मोदींच्या सभेच्या ठिकाणी झाले चिखलाचे साम्राज्य

IPL Auction 2025: CSK च्या ताफ्यात अश्विन आण्णाची होणार घरवापसी, तर 'लाला'चीही लागणार वर्णी?

Politics: परळीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का! विश्वासू शिलेदार शरद पवारांच्या ताफ्यात, विधानसभेचं गणित बदलणार?

SCROLL FOR NEXT