L and T Finance, L and T Infra Credit among 7 NBFCs surrendering license to RBI  Sakal
Personal Finance

NBFC License: सात NBFC कंपन्या बाजारातून बाहेर; कंपन्यांनी RBIला नोंदणी प्रमाणपत्रे केली परत, काय आहे कारण?

NBFC License Surrender: L&T फायनान्स, L&T इन्फ्रा क्रेडिट आणि इतर पाच नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांनी (NBFCs) त्यांची नोंदणी प्रमाणपत्रे भारतीय रिझर्व्ह बँककडे परत केली आहेत. यासह, रिझर्व्ह बँकेने त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र (COR) रद्द केले आहे.

राहुल शेळके

NBFC License Surrender: L&T फायनान्स, L&T इन्फ्रा क्रेडिट आणि इतर पाच नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांनी (NBFCs) त्यांची नोंदणी प्रमाणपत्रे भारतीय रिझर्व्ह बँककडे परत केली आहेत. रिझर्व्ह बँकेने त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र (COR) रद्द केले आहे. या कंपन्यांचे विलीनीकरण किंवा त्यांनी स्वतःचे काम बंद केल्यामुळे त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

इतर पाच एनबीएफसी ज्यांनी नोंदणी प्रमाणपत्रे परत केली आहेत त्या कंपन्यांमध्ये मरुधर फूड अँड क्रेडिट लि., क्रिएटिव्ह इंट्रा लिमिटेड, जिनवाणी ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी, मंजुश्री फिनकॅप आणि श्रुती फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. (L&T Finance, L&T Infra Credit among 7 NBFCs surrendering license to RBI)

दुसऱ्या निवेदनात, रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की त्यांनी चार NBFC चे COR रद्द केले आहेत. त्यात निमिषा फायनान्स इंडिया, R.M.B फायनान्स कंपनी, सुयश फिनोव्हेस्ट आणि कामधर लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड यांचा समावेश आहे. या चार कंपन्या कोणत्याही बिगर बँकिंग वित्तीय संस्थेचा व्यवसाय करू शकत नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.

NBFC ने नोंदणी प्रमाणपत्र परत केल्यानंतर, RBI त्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. याचा अर्थ आता NBFC नॉन-बँकिंग वित्तीय संस्था म्हणून काम करू शकत नाही. याशिवाय RBI वेबसाईटवरील सध्याच्या यादीतून NBFC चे नाव काढून टाकेल.

RBI सुद्धा NBFC ची नोंदणी रद्द करण्याबद्दलची माहिती आपल्या वेबसाईट आणि इतर माध्यमांद्वारे प्रकाशित करते. यापैकी कोणतीही NBFC त्यांच्या कर्जदारांना पैसे देऊ शकत नसल्यास, RBI कायदेशीर कारवाई करू शकते.

नोंदणी प्रमाणपत्र का परत केले जाते?

NBFC कडून नोंदणी प्रमाणपत्र परत करण्याची वेगवेगळी कारणे आहेत. याचे पहिले कारण म्हणजे विलीनीकरण किंवा टेकओव्हर. जर एनबीएफसी दुसऱ्या एनबीएफसी किंवा बँकेत विलीन झाली असेल, तर ती त्याचे नोंदणी प्रमाणपत्र परत करू शकते.

दुसरे कारण म्हणजे आर्थिक संकटाचे आहे, जर एनबीएफसी आर्थिक संकटात असेल आणि तिच्या कर्जदारांना पेमेंट करू शकत नसेल, तर ती त्याचे नोंदणी प्रमाणपत्र देखील सरेंडर करू शकते. तिसरे, जर कंपनी स्वतः NBFC म्हणून काम करू इच्छित नसेल, तर ती तिचे नाव काढून टाकू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT