Lands for jobs scam ED arrests Amit Katyal promoter of AK Infosystems  Sakal
Personal Finance

Land For Job Scam: लँड फॉर जॉब स्कॅममध्ये ईडीची मोठी कारवाई; लालूंच्या जवळचा उद्योगपती अमित कात्यालला अटक

Land For Job Scam: अमित कात्याल सुमारे दोन महिन्यांपासून ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करत होता.

राहुल शेळके

Land For Job Scam: जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात लालू यादव यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. लालू यादव कुटुंबाचा कथित सहकारी अमित कात्याल याला ईडीने अटक केली आहे. अमित हा एक उद्योगपती आणि एके इन्फोसिस्टमचा प्रवर्तक आहे. या कंपनीचा मनी लाँड्रिंगमध्येही सहभाग आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी कात्यालला ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर त्याला अटक केली. लालू-तेजस्वी यांच्या जवळचे म्हटल्या जाणार्‍या कात्यालला स्थानिक न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे, जिथे ईडी चौकशीसाठी त्याची कोठडी मागणार आहे.

कात्याल सुमारे दोन महिन्यांपासून ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करत होता. ईडीने या वर्षी मार्चमध्ये लालू, तेजस्वी, त्यांच्या बहिणी आणि इतरांच्या घरावर छापे टाकले तेव्हा कात्यालशी संबंधित जागेची झडती घेण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यातील हे प्रकरण 14 वर्षे जुने आहे. त्यावेळी लालू यादव रेल्वेमंत्री होते. लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना लोकांना रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या बदल्यात त्यांच्या जमिनींची नोंदणी करून घेतल्याचा दावा केला जात आहे. लालू यादव 2004 ते 2009 पर्यंत रेल्वे मंत्री होते.

याप्रकरणी सीबीआयने 18 मे रोजी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, लोकांना प्रथम रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांवर पर्याय म्हणून भरती करण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबियांनी जमिनीचा व्यवहार केल्यावर त्यांना नियमित करण्यात आले.

सीबीआयचे म्हणणे आहे की, लालू यादव यांच्या कुटुंबीयांनी पाटण्यात 1.05 लाख स्क्वेअर फूट जमिनीवर कब्जा केला आहे. या जमिनींचा व्यवहार रोखीने झाला. म्हणजेच लालू कुटुंबीयांनी रोख रक्कम देऊन या जमिनी खरेदी केल्या होत्या. सीबीआयच्या म्हणण्यानुसार या जमिनी अत्यंत कमी किंमतीत विकत घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ?

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT