Cohere AI bill gates esakal
Personal Finance

Cohere AI: AI मुळे लागली लॉटरी, बिल गेट्सला मागे टाकून बनला जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती

सध्या एआयमुळे अनेक कंपन्यांचे नशीब बदलू लागले आहे.

राहुल शेळके

Cohere AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची आजकाल खूप चर्चा आहे. त्यामुळे काही ठिकाणी नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर काही ठिकाणी चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्याचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. पण सध्या एआयमुळे अनेक कंपन्यांचे नशीब बदलू लागले आहे.

एआयमुळे कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी अमेरिकन शेअर बाजार 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. याचा सर्वाधिक फायदा ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन यांना झाला, जे पहिल्यांदाच जगातील श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्सच्या पुढे गेले आहेत.

AI च्या जोरावर एलिसन यांनी बिल गेट्सला टाकले मागे:

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गुरुवारी, एलिसन जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आणि त्याची एकूण संपत्ती 5.92 अब्ज डॉलरने वाढून 135 अब्ज डॉलर झाली. तर बिल गेट्स या यादीत 131 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर घसरले आहेत.

या वर्षी, एलिसनची एकूण संपत्ती 43.5 अब्ज डॉलर आणि बिल गेट्सची एकूण संपत्ती 21.9 डॉलर अब्जने वाढली आहे. एलिसन यांनी 2014 मध्ये ओरॅकलचे सीईओ पद सोडले.

पण त्यांनी कंपनी सोडली नाही. त्यानंतर ते ओरॅकलचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी झाले. ओरॅकलमध्ये त्यांची 42.9 टक्के भागीदारी आहे.

ओरॅकलच्या शेअर्समध्ये यंदा 42 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी, कंपनीने 50 अब्ज डॉलर महसूल मिळवला आहे. AI मध्ये गुंतवणुकीचा फायदा ओरॅकलला ​​झाला आहे.

ओपन एआयच्या स्पर्धक कोहेरेमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. एआय स्टॉक्समध्ये वाढ झाल्याने एलिसनची संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर:

जगातील उर्वरित श्रीमंतांची यादी पाहिली तर टेस्लाचे सीईओ एलोन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलर आहे. फ्रान्सचा बर्नार्ड अर्नॉल्ट 196 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

तर Amazon चे संस्थापक जेफ बेझोस 151 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT