LIC Mutual Fund SIP Rs 100 Sakal
Personal Finance

LIC Mutual Fund: एलआयसीची मोठी घोषणा; गुंतवणूकदारांसाठी आणणार 100 रुपयांची SIP, काय आहे प्लॅन?

राहुल शेळके

LIC Mutual Fund: एलआयसी म्युच्युअल फंड ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात छोट्या रकमेची एसआयपी सुरू करण्याची योजना आखत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर के झा यांनी ही माहिती दिली.

ही SIP 100 रुपयांची असेल. हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा बाजार नियामक सेबी गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी छोट्या एसआयपीचा सल्ला देत आहे.

सध्या, फक्त काही फंड 500 रुपयांपेक्षा कमी SIP ऑफर करतात. LIC म्युच्युअल फंडाची योजना सध्याच्या 300 रुपयांच्या मर्यादेवरून 100 रुपयांपर्यंत SIP रक्कम कमी करण्याचा विचार करत आहे.

झा म्हणाले की, एसआयपीची रक्कम कमी करण्यासाठी आम्ही 7 ऑक्टोबर रोजी सुधारणा करणार आहोत. एलआयसी एमएफ मॅन्युफॅक्चरिंग फंडच्या(ओपन एंडेड इक्विटी स्कीम) नवीन एनएफओ ऑफरनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

फंड हाऊसचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष 2026 पर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्ता सध्याच्या 35,000 कोटींवरून 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. झा म्हणाले की आम्ही इक्विटी विभागात आमच्या टीमची क्षमता वाढवली आहे.

AUM वाढवण्यासाठी आम्ही B-30 शहरांमध्ये नवीन शाखांसह डिजिटल करण्यावर भर देत आहोत. आम्ही 50 नवीन शाखा उघडण्याची योजना आखत आहोत. डेहराडून, जमशेदपूर, जोधपूर आणि दुर्गापूर इत्यादी शहरांमध्ये या शाखा उघडल्या जातील.

महिनाभरात ते वितरकांसाठी नवीन ॲप आणणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे ॲप गुंतवणूकदारांसाठी सादर केले होते. पुढील दोन तिमाहींसाठी दोन नवीन फंड लॉन्च करण्याची योजना आहे, ज्यात मल्टी-ॲसेट फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Pager Blasts : लेबनॉन पेजर स्फोटांमागे केरळमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा हात? तपासात धक्कादायक खुलासा

Sachin Pilgaonkar : तर रडकी नाही कॉमेडी असती 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका ; सचिन यांचा महत्त्वपूर्ण खुलासा

Call History Check : गेल्या 6 महिन्यांची कॉल हिस्ट्री मिळवा एका क्लिकमध्ये..

भारताची Chess Olympiad स्पर्धेतील मानाची ट्रॉफी चोरीला? AICFच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

IPL 2025 Auction : ऋषभ पंत CSK च्या ताफ्यात जातोय? Delhi Capitals ने जाहीर केली रणनीती

SCROLL FOR NEXT