Life Insurance Corporation Of India  sakal
Personal Finance

Life Insurance Corporation Of India : ‘एलआयसी’ला तिमाहीत ९४४४ कोटींचा नफा

देशातील सर्वांत मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ९,४४४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ९,४४४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. नफ्यात वार्षिक ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीत ६३३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न १,१७,०१७ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत ते १,११,७८८ कोटी रुपये होते. ‘एलआयसी’चे एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तिमाहीतील १९६८९१ कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून २,१२,४४७ कोटी रुपये झाले आहे.

पाचव्या क्रमांकाची मूल्यवान कंपनी

तिमाही निकालानंतर आज ‘एलआयसी’च्या शेअरनी सहा टक्क्यांहून अधिक उसळी घेतली, त्यामुळे तिचे बाजारमूल्य ६.९९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आणि ती पाचव्या क्रमांकाची सर्वांत मूल्यवान कंपनी बनली. ‘बीएसई’वर ‘एलआयसी’चा शेअर ५.८६ टक्क्यांनी वाढून ११०६.२५ रुपयांवर स्थिरावला.

दिवसभरात, तो ९.५१ टक्क्यांनी वाढून ११४४.४५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. ‘एनएसई’वर, तो ६.४६ टक्क्यांनी वाढून १११२ रुपये झाला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य ३८,७४० कोटी रुपयांनी वाढून ६९९७०२.८७ कोटी रुपयांवर पोहोचले. बाजारमूल्याच्या बाबतीत आयसीआयसीआय बँकेला मागे टाकत ‘एलआयसी’ पाचवी सर्वांत मूल्यवान कंपनी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT