LinkedIn Co-Founder Reid Hoffman Sakal
Personal Finance

LinkedIn: 9 ते 5 शिफ्ट इतिहास जमा होणार; लिंक्डइनच्या सह-संस्थापकाचं भाकीत, कोण जास्त पैसे कमावणार?

LinkedIn Co-Founder Reid Hoffman: जर तुम्ही 9 ते 5 नोकरी करत असाल तर तुमची नोकरी धोक्यात आहे. लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन यांचे हे भाकीत इंटरनेटवर व्हायरल होत आहे

राहुल शेळके

LinkedIn Co-Founder Reid Hoffman: जर तुम्ही 9 ते 5 नोकरी करत असाल तर तुमची नोकरी धोक्यात आहे. लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन यांचे हे भाकीत इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की 2034 पर्यंत 9 ते 5 नोकऱ्या कमी होतील.

रीड हॉफमन यांनी सांगितले की भविष्यात, कामगारांना पूर्ण वेळ नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे, परंतु त्याऐवजी ते गिग अर्थव्यवस्थेत सहभागी होतील. याचा अर्थ असा की तुम्ही अनेक क्षेत्रात विविध कंपन्यांसोबत करारानुसार काम करु शकता. पारंपारिक पोझिशन्सच्या तुलनेत, या मार्गाने तुम्हाला अधिक लवचिकता आणि अधिक पर्याय उपलब्ध असतील.

उद्योजक आणि गुंतवणूकदार नील तापडिया यांनी हॉफमनचा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यासोबतच त्यांचे काही अंदाज खरे ठरले आहेत. तापडिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणले आहे की हॉफमनने 1997 च्या सुरुवातीला सोशल मीडिया, शेअरिंग इकॉनॉमी आणि AI च्या क्रांतीची कल्पना दिली होती.

ते म्हणाले की AI ज्या वेगाने विकसित झाला आहे तो अविश्वसनीय आणि थोडा त्रासदायक आहे. ChatGPIT बाजारात आल्याच्या काही दिवसातच, जगभरातील लाखो नोकऱ्या कमी महत्त्वाच्या झाल्या आणि अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना AI तंत्रज्ञानासह काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

तापडिया यांनी चॅटजीपी आयटीच्या अनेक वर्षे आधीच्या AI क्रांतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तापडिया यांनी असेही सांगितले की भविष्यात फ्रीलांसर कायम कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पैसे कमावतील आणि रिझ्युमे/सीव्हीचा ट्रेंड संपेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT