Loan On Mutual Funds Sakal
Personal Finance

Loan On Mutual Funds: कर्ज घ्या पण स्मार्टरीत्या! म्युच्युअल फंडवरही मिळते कर्ज, असे आहेत फायदे

Loan Against Mutual Funds: डिजिटल प्रक्रियेमुळे म्युच्युअल फंडावर कर्ज घेणं खूप सोपं झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

Loan Against Mutual Funds: एखादी चांगली वस्तू खरेदी करायची असेल तर आपण चांगला सणासुदीचा मुहूर्त काढून ती खरेदी करतो. पितृपक्ष कालावधी पार पडल्यानंतर लोकांच्या खरेदीला उधाण येत असते. येणाऱ्या दसरा दिवाळी या सणासुदीच्या काळात बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत असते.

अनेकदा आपल्याला आपल्या आयुष्यात एखादं मोठ काही काम करायचे असेल तर अनपेक्षित आपत्कालीन परिस्थिती उद्भवते याची पूर्वतयारी असणे आवश्यक आहे; त्यासाठी आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते.

मग कधी कोणाचे आजारपण असते, कधी कोणाला घराची डागडुजी करायची असते तर कधी कोणाला एखादी गाडी घ्यायची असते अशा या सारख्या अनेक गोष्टी असू शकतात.

पण प्रत्येक वेळी बँकेत जाणे त्याकरिता जे तारण लागते ते मग सोने असू शकते किंवा जमीन तारण ठेवायची असेल तर जमिनीचे सात बारा घेवून जायला हवे, सोने घेवून जात असताना चोरी होण्याची भीती असते. कोणताही वैयक्तिक छोटा प्रकल्प करायचा असेल तर केलेली गुंतवणूक वापरणे हे योग्य नव्हे.

मग त्याकरिता कर्ज हा पर्याय असू शकतो पण मग तो जर घरी बसल्या आपल्याला मिळाला तर वेळ वाचेल, घरातील सोने बँकेत घेवून जाण्याचा त्रास आणि जबाबदारी कमी होऊ शकते. मग काय करता येवू शकते?

गेल्या काही वर्षापासून आपण म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असाल आणि आत्ता त्याचे मूल्य चांगले वाढले असेल तर त्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर आपल्याला कर्ज मिळू शकते. कर्ज काढण्यसाठी तारण म्हणून सोने, जमीन, घर तारण ठेवले जाते. पण बदलत्या काळानुसार तुम्ही गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडाचे युनिट तारण ठेवून त्यावर कर्ज मिळू शकते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीची असेल तर त्याचे मूल्य बँकेतल्या ठेवी पेक्षा चांगलीच वाढलेलं असते. अशा वेळी घरी बसून आपण कर्जाची प्रक्रिया करून आपल्या बँकेतल्या खात्यावर कर्जाची रक्कम त्वरित जमा होऊ शकते.

आता हे मिळालेलं कर्ज आपण अगदी घराचे नूतनीकरण करणे असो, आजारपण असो, तातडीने शैक्षणिक फी भरायची असेल या सारख्या कोणत्याही कारणासाठी वापरू शकतो. पण समजा जर वाहन कर्ज म्हणून ही रक्कम वापरली तर आपल्या फायद्याचे होईल.

जर बँकेकडून कर्ज घेवून आपण वाहन घेतले तर आपल्याला जास्तीचे व्याज तर द्यावे लागेलच पण त्या वाहनाची मालकी सुद्धा कर्जदाराकडे न राहता ती बँकेकडे राहते.

जेव्हा संपूर्ण कर्जाची बँकेकडे परतफेड होईल त्यावेळीच ती मालकी कार्जादाराकडे येवू शकते पण त्यासाठी रस्ते वाहतूक कार्यालयात म्हणजे RTO मध्ये जावून ती सर्व सरकारी प्रक्रिया करून काही दिवसांनी ती मालकी वाहन कर्जदाराकडे येऊ शकते. अर्थात हे सगळे वेळखाऊ आणि किचकट काम आहे.

पण समजा जर म्युच्युअल फंड वर वाहन कर्ज घेतले तर ते सहज मिळू शकते, वेळ तर वाचतोच पण ते सहज आणि सुलभपणे उपलब्ध होते. वाहन कर्ज घेतल्यानंतर आपल्याला हवे असलेले वाहन घेवून आपण घरी येवू शकतो आणि त्याची मालकी सुद्धा कर्जदाराकडेच राहते. रस्ते वाहतूक कार्यालयात जाण्याचा वेळ वाचला, श्रम वाचले, आणि वस्तू ही आपल्या घरी आली.

या म्युच्युअल फंडावरील कर्जाचा व्याजदर निव्वळ वाहन कर्ज यात तुलना केली तर म्युच्युअल फांडावरील व्याजदर कमी असतो. आणि शिवाय आपल्या म्युच्युअल फंडाचे मूल्य वाढत असते.

म्युच्युअल फंडावरील घेण्यात येणाऱ्या कर्जाला ओव्हर ड्राफ्टची ही सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही पाच लाखांचा ओरड्राफ्ट घेऊन महिन्यात प्रत्यक्षात दोन लाख रुपये वापरले तर व्याज केवळ दोन लाखांवर द्यावे लागेल.

कर्ज पूर्ण परतफेड होईपर्यंत तारण ठेवलेला म्युच्युअल फंड आपण विकू शकत नाही तुमच्या होल्डिंगच्या 45 टक्के कर्ज मिळू शकतं. म्युच्युअल फंडावर जर कर्ज घ्यायचे असेल तर झटपट प्रक्रिया व्याजही कमी असतो तसेच सिक्युरिटीच्या बदल्यातील कर्जात समभाग म्युच्युअल फंड आणि रोखे तारण ठेवून कर्ज दिले जाते. बँका आणि वित्तीय संस्था हे कर्ज देतात.

मिराए असेट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड चे विशेष कार्यकारी अधिकारी किशन कन्हैया म्हणाले की, “अल्पकालीन ते मध्यम मुदतीच्या पैशांची आवश्यकता असल्यास म्युच्युअल फंड/शेअर्सवरील कर्जाचा वापर केला पाहिजे.

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या बाबतीत कर्ज आणि गुंतवणुकीचे मूल्य याचे गुणोत्तर 45 टक्के आहे. कर्ज रक्कम जितके दिवस वापरले गेले आहे त्यावर वार्षिक 9 टक्के व्याज आहे.

कर्जदार आपल्या एका वर्षाच्या कर्जाच्या कालावधीत कधीही रक्कम परत करू शकतो त्यावर कसलाही दंड नाही. कर्जदार एका वर्षानंतर गरज पडल्यास कर्जाचे नूतनीकरण करू शकतो.

डिजिटल प्रक्रियेमुळे म्युच्युअल फंडावर कर्ज घेणं खूप सोपं झाला आहे अवघ्या अर्ध्या ते एक तासात हे कर्ज मिळतं. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी खूप कागदोपत्री प्रक्रिया आणि कार्यवाही करावी लागते; पण म्युच्युअल फंडावरील कर्जासाठी कागदपत्रे कार्यवाहीची गरज नसते. म्युच्युअल फंडावर जर कर्ज घेतले तर वार्षिक 9 ते 11 टक्के व्याज द्यावे लागते याउलट वैयक्तिक कर्जावर 12 ते 15 टक्के व्याज लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT