loan application fraud greed nbfc digital era crime cyber marathi news sakal
Personal Finance

स्मार्ट माहिती : ‘लोन ॲप’चे मायाजाल

कर्ज घ्यायचे असेल, तर बँका, पतसंस्था किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) मधून घेतले जायचे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अपूर्वा जोशी | अमित रेठरेकर

कर्ज घ्यायचे असेल, तर बँका, पतसंस्था किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) मधून घेतले जायचे. मात्र, डिजिटल क्रांती झाली आणि ‘फिनटेक’च्या उदयामुळे मोबाईलवर केवळ एका क्लिकच्या माध्यमातून लगेच कर्ज मिळू लागले. मात्र, समाजकंटक प्रवृत्तींनी याचा गैरफायदा घेतला.

पूर्व-मंजूर कर्जाचे आमिष

तुम्ही गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘लोन’, ‘क्विक कॅश’सारखे शब्द शोधल्यास अशी अॅप लगेच मिळतात. अशा अॅपच्या कंपन्या पाच ते पन्नास हजार रुपयांची ‘पूर्व-मंजूर’ कर्जे देतात. गुगलपेद्वारे पैसे लगेच तुमच्या खात्यात जमा होतात.

या कंपन्या आगाऊ उच्च प्रक्रिया शुल्क आकारतात, तर काही साप्ताहिक व्याजदेखील आकारतात. कर्जवसुलीसाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब केला जातो आणि तुम्ही दुष्टचक्रात अडकत जाता. थोडक्यात, ‘सावकारी’चे हे आधुनिक स्वरूप आहे, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.

चीनप्रणीत अॅपद्वारे कोट्यवधींचा अपहार

चायनीज लोन ॲप घोटाळ्यात मोबाईल ॲप, मनी म्युल्स आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर कसा केला गेला हे उघड झाले. भारत सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईमध्ये अवैध अर्थव्यवहार, गोपनीयता कायद्याचे उल्लंघन आणि गुन्हेगारी कृतींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्यावर जवळपास ५८१ कोटी रुपये जप्त केले गेले आणि १३८ बेटिंग अॅप आणि ९८ लोन ॲपवर बंदी घातली गेली.

सावधान! पुढे धोका आहे...

तुम्हाला त्वरित पैशांची गरज असताना मोबाईलवर अशा फसव्या लोन अॅपची जाहिरात दिसली, की मन विचलित होते. असे कर्ज घेणे हे मित्राकडून गुगलपे किंवा फोनपेवर पैसे घेण्यासारखे सुलभ वाटले, तरी

खालील प्रश्न स्वतःला विचारा :

  • ज्या अॅपवरून त्वरित कर्ज काढणार आहात, त्यांना वित्तपुरवठा करण्याची भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी आहे का?

  • अॅपमध्ये कंपनीचा पत्ता दिलेला आहे का?

  • अशा अॅपची वेबसाइट अस्तिवात आहे का? वेबसाइट असल्यास ती ‘https’ अशी सुरक्षित आहे का?

  • अॅपमध्ये कर्ज घेताना अर्ज करून ‘केवायसी’ तपासून, सिबिल स्कोअर काढला जातो का?

  • कर्ज करार आणि त्यामध्ये हप्ता, व्याजदर, दंड रक्कम आकारणी अशा महत्त्वाच्या बाबी नमूद असतात त्या आहेत का?

  • कर्ज मिळण्यासाठी कागदपत्रे (उत्पन्नाचा दाखला, प्राप्तिकर विवरणपत्र, बँक खाते उतारा) अॅपवर द्यावी लागतात का?

  • अशा अॅपवर कर्ज घेताना प्रोसेसिंग फीची रक्कम आगाऊ देय नाही ना?

  • अॅपवरील कर्जाचा व्याजदर अवाजवी वाटत नाही ना?

  • ताबडतोब कर्ज घेतल्यास काही लाभ मिळतील, अशी विशिष्ट सूचना केली जात नाही ना?

  • ज्या अॅपमार्फत कर्ज घेणार आहात त्याच्याबद्दल फ्रॉड झाल्याचे किंवा फसवल्याचे अभिप्राय नाहीत ना?

वरील दहा प्रश्‍न हे धोक्याची सूचना देणारे लाल झेंडे आहेत. ते तुम्हाला भविष्यातील आर्थिक फटका, मनस्ताप आणि कायदेशीर भानगडीपासून वाचवू शकतात.

तात्पर्य : गाडी, घर, जमीन किंवा अन्य मोठ्या वस्तूंची खरेदी ते उद्योग, व्यवसायांसाठी कर्ज घेणे साहजिक आहे. कर्जाचे उद्देश, आपल्याला परवडणाऱ्या क्षमतेत आणि वाजवी व्याजदर आणि मुदत असल्यास कर्ज चांगले मानले जाते.

केवळ सुलभतेने मिळते म्हणून कर्ज घेणे तुमच्या आर्थिक तब्येतीसाठी तुम्ही स्वतःहून ओढवलेले आजारपण आहे. त्यामुळे अॅपद्वारे किंवा तुमच्या बँकेकडून ‘पूर्व-मंजूर’ कर्ज घेण्याची ऑफर आली असली, तरी त्याची परतफेड हे आपलेच उत्तरदायित्व आहे, हे कायम स्मरणात ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT