Nirav Modi London High Court Sakal
Personal Finance

Nirav Modi: दुबईतील कंपनीचा होणार लिलाव? तुरुंगात असलेल्या नीरव मोदीला लंडन कोर्टाचा झटका, 'इतके' कोटी भरण्याचे दिले आदेश

Nirav Modi London High Court: भारतातून लंडनला पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने शुक्रवारी (8 मार्च) हिरे व्यापारी नीरव मोदीच्या विरोधात निकाल दिला

राहुल शेळके

Nirav Modi London High Court (Marathi News): भारतातून लंडनला पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने शुक्रवारी (8 मार्च) हिरे व्यापारी नीरव मोदीच्या विरोधात निकाल दिला, आणि त्याला बँक ऑफ इंडियाला 8 दशलक्ष डॉलर (66 कोटी रुपये) भरण्याचे आदेश दिले.

यापूर्वी, बँक ऑफ इंडियाने नीरव मोदीच्या दुबईस्थित कंपनी फायरस्टार डायमंड एफझेडई कडून 8 दशलक्ष डॉलर वसूल करण्यासाठी लंडन उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

लंडन उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयाचा एक भाग म्हणून नीरव मोदीकडून पैसे वसूल करण्यासाठी बँक ऑफ इंडियाला दुबईस्थित कंपनीसह जगात कुठेही नीरव मोदीच्या मालमत्ता आणि मालमत्तांचा लिलाव करण्याचा अधिकार दिला. (London High Court orders Nirav Modi to pay Bank of India 8 million Dollars)

8 दशलक्ष डॉलर (66 कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत ज्यामध्ये 4 दशलक्ष डॉलर मुद्दल आणि 4 दशलक्ष डॉलर व्याजाचा समावेश आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनमधील थेमसाइड तुरुंगात बंद आहे.

नीरव मोदीबाबत न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करताना, BOI चे वकील मिलन कपाडिया म्हणाले, "आम्ही या निर्णयावर समाधानी आहोत आणि पुढील वाटचालीची वाट पाहत आहोत.

नीरव मोदीकडे केसचे पैसे भरण्यासाठीही पैसे नाहीत

BOI ने नीरव मोदीच्या फायरस्टार कंपनीला 9 दशलक्ष डॉलर कर्ज दिले होते, परंतु जेव्हा बँकेने 2018 मध्ये परतफेड करण्याची मागणी केली तेव्हा निरव मोदीकडे पैसे नव्हते.

नीरव मोदी फायरस्टार एफझेडईचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता आणि तो कर्जाचा हमीदारही होता. लंडन तुरुंगात बंद असलेल्या नीरव मोदीने त्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची कायदेशीर बिले अद्याप निकाली काढलेली नाहीत.

भारत सरकारने त्याची मालमत्ता ताब्यात घेतल्याने त्याच्याकडे कोणताही निधी नसल्याचे त्याने कोर्टाला सांगितले. त्याने मॅजिस्ट्रेटला सांगितले की तो मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन कायदेशीर खर्च भरत आहे.

11,000 कोटी रुपयांचा मालक होता नीरव मोदी

डायमंड किंग म्हणून प्रसिद्ध असलेला नीरव मोदी बेल्जियममधील अँटवर्प शहरातील प्रसिद्ध डायमंड ब्रोकर कुटुंबातील आहे. अमेरिकेच्या व्हार्टन स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर नीरव मोदीने 2010 मध्ये स्वतःच्या नावाने ज्वेलरी ब्रँड सुरू केला.

त्याच्या डिझाइन केलेल्या दागिन्यांना हॉलिवूडमध्ये विशेष मागणी होती. त्याचा ब्रँड इतका प्रसिद्ध झाला की तो 2017 मध्ये फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत 85 व्या क्रमांकावर पोहोचला. नीरव मोदीकडे त्यावेळी 1.73 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 11,000 कोटी रुपये होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT