Low-cost airline Air Kerala Sakal
Personal Finance

New Airline: देशात सुरु होणार आणखी एक विमानसेवा; स्वस्तात करता येणार प्रवास, सरकारकडून मंजूरी

Low Cost Airline Air Kerala: नवी एअरलाइन लवकरच भारतात दाखल होऊ शकते. या बजेट एअरलाइनचे नाव एअर केरळ असणार आहे. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाने मान्यता दिली आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही विमानसेवा 2025 मध्ये सुरू करण्याची योजना असल्याची माहिती मिळाली आहे.

राहुल शेळके

Air Kerala: नवी एअरलाइन लवकरच भारतात दाखल होऊ शकते. या नवीन एअरलाइनचे नाव एअर केरळ असणार आहे. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाने मान्यता दिली आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही विमानसेवा 2025 मध्ये सुरू करण्याची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. लॉन्च झाल्यानंतर ही एअरलाइन प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज होईल.

या एअरलाईन्सबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले आहे की, या एअरलाइनच्या सुरुवातीला तीन एटीआर 72-600 विमाने वापरण्यात येणार आहेत. ही एअरलाइन देशातील टियर 2 आणि टियर 3 सारख्या छोट्या शहरांना जोडणार आहे. एअर केरळने दुबईतील पत्रकार परिषदेत कंपनीला सरकारकडून एनओसी मिळाल्याची घोषणा केली आहे.

दुबईच्या 2 व्यावसायिकांचा पाठिंबा मिळाला

एअर केरळच्या या नवीन विमान कंपनीला दुबईतील दोन बड्या उद्योगपती आफी अहमद आणि अयुब कल्लाडा यांचा पाठिंबा मिळाला आहे. ही विमानसेवा भारताच्या दक्षिण भागातील पहिली प्रादेशिक विमानसेवा असणार आहे.

एका अहवालानुसार, जेटफ्लाय एव्हिएशन या नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला हवाई वाहतूक सेवा चालवण्यास 3 वर्षांची मान्यता देण्यात आली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आफी अहमद म्हणाले की, आमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे. या योजनेबाबत अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, पण आम्ही ते प्रत्यक्षात आणले आहे.

परवडणाऱ्या दरात विमानसेवा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश

2023 मध्येच, स्मार्ट ट्रॅव्हल्स एजन्सीचे संस्थापक आफी अहमद यांनी त्यांच्या नावावर airkerala.com डोमेन नाव 10 लाख दिरहममध्ये घेतले होते. केरळ सरकारने 2005 मध्ये पहिल्यांदा या विमान कंपनीची योजना आखली.

एका अहवालाचा हवाला देत या विमान कंपनीची उड्डाणे पुढील वर्षापासून उड्डाणासाठी सज्ज होणार असल्याचे समोर आले आहे. लहान शहरांना कमी किमतीत हवाई सेवा पुरवण्याचे एअर केरळचे उद्दिष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना

एअर केरळ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापूर्वी प्रादेशिक उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे. एअर केरळच्या ताफ्यात 20 विमाने आल्यानंतर ही एअरलाइन आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करू शकते.

या एअरलाइनचे समर्थक अफी अहमद यांनी सांगितले की, आमचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान दुबईसाठी सुरू होणार आहे. त्यानंतर अन्य मार्गांवरही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. एअर केरळमधील प्रारंभिक गुंतवणूक सुमारे 11 कोटी दिरहम असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT