LPG Price Reduced esakal
Personal Finance

LPG prices 1 January 2024 : LPG सिलिंडरच्या किमतीत घट, नववर्षात मिळाली छोटीशी भेट, जाणून घ्या किंमत

LPG prices 1 januray 2024 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. आज 1 जानेवारी 2024 पासून LPG सिलेंडर स्वस्त झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत थोडा बदल झाला आहे, तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने मोठी कपात अपेक्षित होती. कारण 2019 मध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती LPG ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली होती. 14 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 120.50 रुपयांनी कमी झाली आहे. दिल्लीत सिलिंडर 809.50 रुपयांवरून 689 रुपयांवर आला आहे.

पण यावेळचे चित्र वेगळे आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात आज कपात झाली आहे. आज दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1755.50 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी तो 1757.00 रुपये होते. आज तो केवळ 1.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याचबरोबर कोलकात्यात या सिलिंडरची किंमत 1869.00 रुपये झाली आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये तो 1868.50 रुपये होता. त्यात आज 50 पैशांची वाढ झाली आहे. तर मुंबईत 1710 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आजपासून 1708.50 रुपयांना मिळणार आहे.चेन्नईमध्ये तो आता 1929 रुपयांऐवजी 1924.50 रुपयांना विकला जाईल.

घरगुती सिलिंडरचे दर 'जैसे थे'

आजही, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. घरगुती सिलिंडर 30 ऑगस्ट 2023 च्या दराने उपलब्ध आहेत. सध्या हा सिलिंडर दिल्लीत ९०३ रुपयांना उपलब्ध आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, सिलिंडरच्या दरांमध्ये शेवटची मोठी कपात 30 ऑगस्ट 2023 रोजी झाली होती. तो 1103 रुपयांवरून 903 रुपयांवर म्हणजेच 200 रुपयांनी स्वस्त झाला होता. आज घरगुती सिलिंडरची किंमत कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT