Success Story: भारत-पाकिस्तानची फाळणीमुळे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे स्थलांतर झाले होते, ज्यामध्ये दोन्ही देशांतील कोट्यवधी लोक बेघर झाले. पण या फाळणीत काही लोक असे होते ज्यांनी सर्वस्व गमावूनही स्वतःचे नशीब घडवले.
आम्ही तुम्हाला अशाच एका यशस्वी भारतीय उद्योगपतीबद्दल सांगणार आहोत, ज्याने भारत-पाकिस्तानच्या फाळणीत खूप काही गमावले, पण या वेदना विसरून आज त्यांनी मोठी उंची गाठली आहे.
मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात अनेक मोठे उद्योगपती आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोळसा व्यावसायिक विनोद अग्रवाल. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी खूप मनोरंजक आहे आणि लाखो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायीही आहे.
इंदूरचे रहिवासी असलेले कोळसा व्यापारी विनोद अग्रवाल हे मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. IIFL Hurun ने भारतातील 1037 श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली होती.
त्यात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या उद्योगपतींचा समावेश होता. विनोद अग्रवाल या यादीत 279व्या स्थानावर होते, तर गेल्या वर्षी ते या यादीत 494व्या स्थानावर होते.
डीएनएच्या अहवालानुसार, अग्रवाल कोल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे विनोद अग्रवाल यांची एकूण संपत्ती 6,000 कोटी रुपये आहे, तर गेल्या वर्षी हा आकडा 4,000 कोटी रुपये होता, परंतु 1 वर्षात कंपनीच्या एकूण संपत्तीत 2,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
विनोद अग्रवाल यांच्या कंपनीची उलाढाल 11,000 कोटी रुपये आहे. 2022 मध्ये, विनोद अग्रवाल यांनी 243 कोटी रुपयांचा आयकर आणि 625 कोटी रुपयांचा जीएसटी कर भरला होता.
एका वर्षात 25 कोटी रुपयांची देणगी
विनोद अग्रवाल हे व्यवसायासोबतच मदतीसाठी आणि उदारतेसाठी ओळखले जातात. विनोद अग्रवाल फाउंडेशनने 2022 मध्ये 25 कोटी रुपयांची देणगी दिली होती.
एक संस्था म्हणून, अग्रवाल कोल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि विनोद अग्रवाल वैयक्तिकरित्या मध्य प्रदेशातील सर्वात मोठे करदाते आहेत.
विनोद अग्रवाल आता एक यशस्वी उद्योगपती आहेत पण त्यांनी भारत-पाकिस्तान फाळणीत त्यांनी अर्ध कुटुंब गमावलं होतं आणि त्यानंतर ते वयाच्या तीसऱ्या वर्षी उर्वरित कुटुंबासह इंदूरला आले.
सुरुवातीच्या काळात ते 500 चौरस फुटांच्या घरात राहत होते. मात्र, सर्व आव्हानांचा सामना करत विनोद अग्रवाल यांनी मोठी उंची गाठली आणि आज ते मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.