Rajya Sabha Elections 2024: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवत असतात. ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची मुलाखतही घेतली होती. आता महाराष्ट्रातून रघुराम राजन यांना राज्यसभेचे उमेदवार केले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अलीकडेच राजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून राजन हे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Raghuram Rajan Rajya Sabha)
या चर्चेबाबत रघुराम राजन यांनी लिंक्डइनवर पोस्ट करत सांगितले की 'माध्यमांमध्ये माझ्या भेटीची आणि राज्यसभेच्या जागेची चर्चा सुरू आहे. मी त्याबद्दल कोणत्याही पक्षाशी चर्चा केलेली नाही. मी अभ्यासक आहे, राजकारणी नाही.'
मात्र, 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार असून निवडणुकीत नवे उमेदवार निवडून येणार आहेत. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी विधानसभा सदस्यांची किमान 42 मतांची आवश्यकता असेल. (Rajya Sabha Elections 2024 Raghuram Rajan)
गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. काँग्रेसचे 44 आमदार आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीची एकजूट दाखवण्यासाठी ठाकरे गट आणि शरद पवार गट काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतात.
मात्र, अद्याप काहीही ठरलेले नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील विद्यमान राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे.
सध्या महाराष्ट्रात प्रकाश जावडेकर, अनिल देसाई, कुमार केतकर, व्ही मुरलीधरन, नारायण राणे आणि वंदना चव्हाण हे राज्यसभेचे खासदार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.