Ratan Tata Maharashtra State Skill Development University Sakal
Personal Finance

Ratan Tata: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! कौशल्य विकास विद्यापीठ आता रतन टाटांच्या नावाने ओळखले जाणार

राहुल शेळके

Ratan Tata: महाराष्ट्र सरकारने सोमवारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाचे नाव बदलून “रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ” असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 वर्षी 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी मुंबईतील वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना वयाशी संबंधित वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. टाटा समूहाने सुरुवातीला लोकांना सांगितले होते की, त्यांच्या आरोग्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. नंतर कारण न सांगता त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.

रतन टाटा यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या दोन दशकांहून अधिक कार्यकाळात टाटा समूहाला भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रभावशाली समूह बनवला. त्यांच्या नेतृत्वाखाली, समूहाचा महसूल 70 पटीने वाढला आणि 2023-24 या आर्थिक वर्षात USD 165 बिलियनवर पोहोचला.

ब्रिटीश पोलाद निर्माता कंपनी कोरस, लक्झरी कार उत्पादक जग्वार लँड रोव्हर आणि जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी टेटली या कंपन्यांच्या अधिग्रहणाचे श्रेय रतन टाटा यांना जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gunaratn Sadavarte: बिगबॉसमध्ये गेलेल्या सदावर्तेंवर हायकोर्टाची नाराजी! त्यांना गांभीर्यच नसल्याचा ठेवला ठपका

ST Bus Ticket Rates : दिवाळीला घरी जाणाऱ्यांसाठी खुशखबर! एसटी बसची हंगामी दरवाढ रद्द

Uttar Pradesh: दुर्गा मूर्ती विसर्जनात गोंधळ, एका तरुणाचा मृत्यू, परिसरात तणाव, गाड्या जाळल्या अन् दुकाने पेटवली, प्रकरण काय?

'भैय्या म्हणू नका ते तुमचा अ‍ॅटिट्यूड तुमच्या खिशात ठेवा', कॅब चालकाचे प्रवाशांसाठीचे नियम सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: रामटेकच्या घोटिटेक इथं 4 विद्यार्थी तलावात बुडाले

SCROLL FOR NEXT