Maharashtra Government Set To Buy Iconic Air India Building For 1600 Crore Know Why  Esakal
Personal Finance

Air India: शिंदे सरकारने एअर इंडियाची इमारत घेतली विकत; 'इतक्या' कोटींना झाली डील

Air India: मंत्रालय विस्तारात रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे.

राहुल शेळके

Air India: महाराष्ट्र सरकारने नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत खरेदी केली आहे. तिचे मंत्रालय विस्तारात रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. या इमारतीची मालकी असलेल्या एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या 1,600 कोटी रुपयांच्या ऑफरला सहमती दर्शवली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती आणि महाराष्ट्र सरकारला इमारत विकत घेण्यासाठी प्राधान्य देण्याची विनंती केली होती.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सांगितले होते की, त्यांच्या मते या इमारतीची किंमत 2,000 कोटींहून अधिक आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारला एअर इंडियाकडून सुमारे 300 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची गरज आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात इमारतीसाठी बोलणी सुरू केल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार अंतर्गत 2021 मध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली, परंतु कोणताही करार अंतिम झाला नाही.

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातही ही इमारत दहशतवाद्यांचे लक्ष्य बनली होती. प्रचंड आर्थिक संकटातून जात असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाने 2018 मध्ये ही 23 मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला होता.

मंत्रालयाचे काम एकाच छताखाली आणणे हा त्याचा उद्देश होता. खरेदी सुरू असतानाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात सत्तापरिवर्तन झाले आणि हा सौदा पुढे जाऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT