Maharashtra Interim Budget 2024:  esakal
Personal Finance

Maharashtra Interim Budget 2024: महिलांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर, कोण आहेत लाभार्थी ?

Ladki Bahin Yojana Maharashtra Budget 2024: राज्य सरकारने लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा आज केली

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget 2024:

पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारने लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा आज केली.

महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. (Maharashtra Interim Budget 2024)

महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना, घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना मी घोषित करत आहे. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल.

राज्याने 1994 मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी काल सुसंग सुधारणा करण्यात आल्या होत्या. नुकतेच राज्याचे चौथे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिला व मुलींना सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्याकरता पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण उद्योजकता तसेच कौशल्य विकासासाठी विविध योजना राबवता येतील,असेही अजित पवार म्हणाले.

मुलीच्या जन्माचे स्वागत करणार

मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष 18 पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना आखण्यात आली आहे. गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रस्तुती करता जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, प्रवासामध्ये सवलत त्यासाठी विशेष बस, महिलांच्यासाठी यासाठी व्यवसाय करातून सूट महिला वसतिगृह महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

राज्यातील १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देण्यात येईल

आजच्या अर्थसंकल्पात महिला रिक्षा चालकांसाठीही योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली. पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 शहरात 10 हजार महिलांना राज्यात महिलांना १० हजार पिंक रिक्षा देण्यात येईल. तसेच, रिक्षा खरेदीसाठी अर्थसाह्य करण्यात येईल.

मध्य प्रदेशातील 'लाडली बहना' योजना काय आहे?

मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महिला आणि मुलींसाठी लाडकी बहिण योजना आणली आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.  


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT