मुंबई: देशातील दागिने, रत्ने यांची निर्यात वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, निर्यातदारांच्या मदतीसाठी एक समिती स्थापन करावी, अशी सूचना केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलला (जीजेईपीसी) केली.
जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या (जीजेईपीसी) २०२४ च्या ‘जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड शो’चे उद्घाटन करताना ते बोलत होते.
गोयल म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदींच्या धोरणामुळे भारत हिरे आणि दागिने उद्योगाचेही केंद्र बनू शकतो. दागिने व फॅशन यांच्या एकत्रित वाढत्या बाजारपेठेमुळे जगाचे ‘वेडिंग डेस्टिनेशन’ बनण्याची क्षमताही भारताकडे आहे.’’
नवी मुंबईतील २० एकर क्षेत्रफळावर उभारण्यात येत असलेल्या ज्वेलरी पार्कसह हिरे उद्योगासाठी अन्य जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक केली जात आहे. मुंबईच्या ‘सीप्झ’मध्येही हिरे उद्योगासाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारले जात आहे.
अनुकूल वातावरण निर्मितीवर भर दिला जात असून, डिझाइनमध्येही आपण मोठ्या प्रमाणावर निर्यात केली पाहिजे. तरुण गुणी आणि कुशल कलाकारांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही आवाहन त्यांनी केले.
ठळक वैशिष्ट्ये...
हिरे आणि दागिने उत्पादन बाजारपेठ ४४ अब्ज अमेरिकी डॉलरची
सात वर्षांत १३४ अब्ज अमेरिकी डॉलरवर
निर्यात २०२७ मध्ये ७५ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत
निर्यात २०३० पर्यंत शंभर अब्ज डॉलरपर्यंत
भारतीय अर्थव्यवस्था २०३० पर्यंत पाच लाख कोटी डॉलरची करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकारण्यात हिरे उद्योग मोठा हातभार लावेल. ते ध्येय गाठण्यासाठी आम्ही या क्षेत्राची निर्यात २०२७ मध्ये ७५ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याची, तर २०३० पर्यंत शंभर अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा आराखडा केंद्र सरकारला दिला आहे.
— विपुल शहा, अध्यक्ष, ‘जीजेईपीसी’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.