Mobile Sakal
Personal Finance

Mobile Export : मेक इन इंडिया; मोबाईल निर्यात ८५ हजार कोटींहून अधिक

सकाळ वृत्तसेवा

देशात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन वाढावे यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ८५,००० कोटी रुपयांहून अधिक मोबाईल निर्यात करण्यात यश आले आहे.

नवी दिल्ली - देशात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन वाढावे यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ८५,००० कोटी रुपयांहून अधिक मोबाईल निर्यात करण्यात यश आले आहे. मोबाईल उत्पादन उद्योगाच्या शिखर संघटनेने दिलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (आयसीईए) दिलेल्या आकडेवारीनुसार, स्थानिक पातळीवर उत्पादन वाढावे यासाठी सरकारने विविध प्रोत्साहन योजना राबविल्या आहेत. त्याचा फायदा झाला असून, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातून १० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ८५ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याची स्मार्टफोन निर्यात झाली आहे.

उत्पादन- निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजनांमुळे देशातून होणारी स्मार्टफोनची निर्यात गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील निर्यातीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. भारत सध्या यूएई, अमेरिका, नेदरलँड्स, ब्रिटन आणि इटली या पाच देशांना मोबाईल फोनची निर्यात करत आहे. तर भारतात विकले जाणारे ९७ टक्क्यांहून अधिक स्मार्टफोन आता स्थानिक पातळीवर तयार केले जात आहेत.

देशातील मोबाईल फोन उद्योग ४० अब्ज डॉलर उत्पादनाचा टप्पा ओलांडेल आणि निर्यात २५ टक्के वाढून १० अब्ज डॉलरपेक्षा अधिक होईल, असे संघटनेचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू यांनी म्हटले होते.

आय फोनचे उत्पादन वाढणार

भारतात २०२७ पर्यंत अॅपलच्या ४५ ते ५० टक्के आयफोनचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. २०२२ पर्यंत ८० ते ८५ टक्के आयफोनचे उत्पादन चीनमध्ये होत होते. २०२२ अखेर अॅपलच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या १० ते १५ टक्के आयफोन निर्मिती भारतात सुरू झाली. भारतात आयफोन १२, १३, १४ आणि १४ प्लसचे उत्पादन केले जाते. अॅपलने डिसेंबर महिन्यात एक अब्ज डॉलर किमतीचे आयफोन निर्यात केली आहे, असेही ‘आयसीईए’ने म्हटले आहे.

मोबाईल उत्पादन उद्योगाची वैशिष्ट्ये

  • भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा मोबाईल फोन उत्पादक

  • स्मार्टफोनची निर्यात गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील निर्यातीच्या तुलनेत दुप्पट

  • संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, नेदरलँड्स, ब्रिटन आणि इटली या पाच देशांना निर्यात

  • भारतात विक्री होणारे ९७ टक्क्यांहून अधिक स्मार्टफोन स्थानिक पातळीवर

  • आयफोन १२, १३, १४ आणि १४ प्लसचे उत्पादन

  • डिसेंबरमध्ये एक अब्ज डॉलर किमतीचे आयफोन निर्यात

देशातील मोबाईल फोन उत्पादन क्षेत्रासाठी २०२३ हे वर्ष मैलाचा दगड ठरेल. कारण या वर्षी देश मोबाईल फोन निर्यातीत एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे.

- राजीव चंद्रशेखर, केंद्रीय राज्यमंत्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT