mandatory to provide documents to borrowers within 30 days guidelines for Banks Penalty Rs5000 per day in case of delay GOOGLE
Personal Finance

RBI : कर्जदारांना कागदपत्रे ३० दिवसांत देणे अनिवार्य; उशीर झाल्यास दररोज ५००० रुपये दंड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्ज फेडल्यानंतर तीस दिवसांच्या आत कर्जदारांना त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे परत करावीत, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने बँका आणि वित्तीय संस्थांना दिली आहे. कर्जाची परतफेड केल्यानंतरही तारण म्हणून ठेवलेल्या मालमत्तेची कागदपत्रे परत मिळवताना बँका आणि वित्तीय कंपन्यांकडून कर्जदारांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे आल्या होत्या, त्याची दखल घेत बँकेने याबाबत आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

संपूर्ण कर्जफेड झाल्यानंतर कर्जखाते बंद केल्यावर कर्जदाराला त्याच्या मालमत्तेची कागदपत्रे तातडीने परत द्यावीत, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. तसेच मूळ मालमत्तेची कागदपत्रे परत मिळण्यास पूर्ण परतफेड किंवा कर्जाच्या सेटलमेंटनंतर ३० दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, बँकेने किंवा वित्तीय संस्थेने कर्जदाराला या विलंबाची कारणे दिली पाहिजेत.

या विलंबासाठी बँक किंवा वित्तीय संस्था कारणीभूत असेल, तर विलंबित कालावधीच्या प्रत्येक दिवसासाठी पाच हजार रुपये याप्रमाणे त्यांनी कर्जदाराला भरपाई अनिवार्य आहे, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे बँका किंवा वित्तीय संस्थांकडून मूळ मालमत्तेची कागदपत्रे हरवल्यास किंवा नुकसान झाल्यास, कर्जदारांना डुप्लिकेट प्रती मिळविण्यात मदत करतील आणि त्यासाठी अंशतः किंवा पूर्ण खर्चाचा भार उचलतील.

विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी पाच हजार रुपये भरपाई व्यतिरिक्त हा खर्च करावा लागणार आहे. तथापि, अशा प्रकरणांमध्ये, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल आणि विलंब कालावधीचा दंड त्यानंतर साठ दिवसांनंतर मोजला जाईल, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

कर्जदार वेळेवर कर्जाची परतफेड करतात. परंतु, कर्जखाते बंद झाल्यानंतर त्यांना त्यांच्या तारण मालमत्तेची कागदपत्रे मिळण्यास विलंब होतो. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे आता कर्ज परतफेडीनंतर मालमत्तेची कागदपत्रे त्वरित जारी करण्यावर भर देणारी रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे कर्जदारांच्या हिताचे रक्षण करण्यास मदत करतील, असे मत आर्थिक क्षेत्रातील सल्लागारांनी व्यक्त केले आहे.

ही मार्गदर्शक तत्त्वे छोट्या बँका सह प्रादेशिक ग्रामीण बँका, सर्व व्यावसायिक बँका, प्राथमिक (शहरी) सहकारी बँका, सर्व राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, आणि सर्व बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना लागू आहेत.

एक डिसेंबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर मूळ मालमत्तेचे दस्तऐवज परत करण्याची तारीख आहे, अशा सर्व प्रकरणांसाठी हे नियम लागू आहेत, असेही बँकेने म्हटले आहे. रिर्झव्ह बँकेच्या या उपाययोजनेमुळे कर्जदारांना मालमत्तेचे दस्तऐवज परत देण्याबाबत नियंत्रित प्रक्रिया अस्तिवात येईल आणि बँकांवर वचक बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! CM एकनाथ शिंदेंच्या बंदोबस्ताला जाताना मोठा अपघात, १२ पोलीस जखमी

Fake SBI Branch: बनावट बँक शाखेचा भांडाफोड; SBIच्या नावे गावकऱ्यांची फसवणूक, लाखो रुपयांना गंडा

अभिनेत्री बोलत असतानाच चालू कार्यक्रमात धाडकन खाली पडला स्टेज; थरारक व्हिडिओ पाहून नेटकरी चिंतेत

Harshvardhan Patil: शरद पवार गटात जाण्याऐवजी... फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना दिला होता पर्याय; ''पण वैयक्तिक प्रगतीपेक्षा...''

Gang Rape in Mumbai: मुंबईत खळबळ! CSMT परिसरात टॅक्सीच्यामागे नेऊन २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT