Mazagon Dock Shipbuilders Sakal
Personal Finance

Mazagon Dock Shipbuilders : माझगाव डॉक शिपबिल्डर्स (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ३१७७)

सकाळ वृत्तसेवा

- भूषण गोडबोले

माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी यार्डांपैकी एक आहे. सरकारने १९६० मध्ये ती ताब्यात घेतल्यानंतर, तिची वेगाने प्रगती झाली. ही कंपनी प्रामुख्याने संरक्षण क्षेत्रासाठी उत्पादन करते. भारत सरकारच्या मालकीची, मालवाहू जहाजांपासून ते ऑफशोअर प्लॅटफॉर्म, विनाशक फ्रिगेट्स, कार्वेट्स आणि पाणबुड्यांपर्यंत सर्व काही बनवते.

कंपनीने आजपर्यंत २८ युद्धनौकांसह ८०२ जहाजे तयार केली आहेत. उत्पादनात लक्षणीय वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अत्याधुनिक उत्पादने यामुळे एका लहान जहाज दुरुस्ती कंपनीपासून ही कंपनी मल्टी-युनिट आणि मल्टी-प्रॉडक्ट कंपनी बनली आहे.

कंपनीने भारतातील; तसेच परदेशातील विविध ग्राहकांसाठी मालवाहू जहाजे, प्रवासी जहाजे, बार्जदेखील वितरित केले आहेत. युद्धनौका बांधण्यासाठी आपली क्षमता वाढवण्याबरोबरच कंपनी लिथियम-आयन बॅटरी, एयूव्ही स्वॉर्म ड्रोन, हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी निर्मितीकडेही कंपनी लक्ष वळवत आहे.

हे देशातील एकमेव शिपयार्ड आहे ज्यामध्ये विनाशिका; तसेच पाणबुड्या बांधण्याचे वैशिष्ट्य आहे. येत्या आठवड्यात २९ मे रोजी तिमाही निकालासाठी कंपनीची बोर्ड बैठक नियोजित आहे. या कंपनीकडे संरक्षण मंत्रालयाच्या उल्लेखनीय प्रकल्पांसह ३८,३८९ कोटी रुपयांची मजबूत ऑर्डर बुक आहे.

अंतरिम अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान भारताच्या संरक्षण मंत्रालयासाठी सुमारे सहा लाख कोटी रुपयांच्या वाटपाचा खुलासा केला. हे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे चार टक्के वाढ दर्शवते. मजबूत उत्पादन मागणी, संरक्षण क्षेत्रासाठी संभाव्य अर्थसंकल्पातील वाढ, संरक्षण आयात कमी करण्यावर;

तसेच देशांतर्गत खरेदीला चालना देण्यावर सरकारचा भर, संरक्षण निर्यातीत सुधारणा आणि सुधारित आर्थिक स्थिती यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचे स्वारस्य वाढले आहे. धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर प्रतिवर्ष सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत, ही कंपनी कार्यरत क्षेत्रात प्रगती करत आहे. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, जोखीम लक्षात घेऊन या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात या, खेळा अन् मॅच झाल्यावर झोपायला दिल्लीत जा! PCB चा टीम इंडियासमोर अजब प्रस्ताव

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT