Meet Gautam Adani's right-hand man Malay Mahadevia doctor-turned-businessman steering a Rs 20,852 crore company  Sakal
Personal Finance

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

राहुल शेळके

Who is Malay Mahadevia: जानेवारी 2023 मध्ये अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहावर शेअर्स अनियमिततेचा आरोप केला होता. पण सुमारे वर्षभरानंतर गौतम अदानी यांना कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आणि कंपनीचे शेअर्स पुन्हा वर गेले. अदानी समूह देशभरात बंदरे, विमानतळ, वीज निर्मिती, हरित ऊर्जा आणि इतर अनेक क्षेत्रात काम करत आहे. फोर्ब्सच्या मते, अदानी यांची रिअल-टाइम नेट वर्थ सुमारे 80.4 अब्ज डॉलर (सुमारे 6.7 लाख कोटी रुपये) आहे.

परंतु प्रत्येक यशस्वी उद्योगपतीला त्याच्या व्यवसायातील अडचणी कमी करण्यासाठी विश्वासार्ह सहकारी आवश्यक असतात. आणि गौतम अदानी बद्दल सांगायचे तर, त्यांचा बालपणीचा मित्र आणि उजवा हात डॉ. महादेविया यांचा अदानी समूहाच्या वाढीमध्ये मोठा वाटा आहे.

डॉ. मलय महादेविया हे अदानी पोर्ट्स अँड एसईझेड (एपीएसईझेड) मध्ये संचालक आहेत आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे (एएएचएल) सीईओ म्हणूनही काम करतात. गौतम अदानी यांच्याशी दीर्घकाळ संबंध असलेले मलय महादेविया 1992 मध्ये अदानी समूहात सामील झाले.

अदानी समूहाच्या वतीने गुजरातमधील सर्वात मोठे खाजगी बंदर मुंद्रा बंदर चालवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दंतचिकित्सक ते व्यापारी या प्रवासात महादेविया यांनी मोठे यश संपादन केले आहे. मुंद्रा बंदराच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मलय महादेविया हे APSEZ चे पूर्णवेळ संचालक आहेत आणि त्यांना मोठा पगार मिळतो. याशिवाय ते अदानी विल्मारचे संचालकही आहेत. अदानी विल्मार ही देशातील सर्वात मोठ्या पाम तेल उत्पादकांपैकी एक आहे आणि आर्थिक वर्ष 2023च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 13,872.64 कोटी रुपये होता.

अदानी समूहासोबतच्या कारकिर्दीपूर्वी, डॉ. मलय महादेविया यांनी अहमदाबादच्या शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयात सहाय्यक प्रोसेसर म्हणून शिकवले. त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून दंत शस्त्रक्रियेमध्ये बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी गुजरात विद्यापीठातून कोस्टल इकोलॉजीमध्ये पीएचडीही केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT