Online Shopping: भारतात ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दैनंदिन वापराच्या बहुतांश गोष्टी ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत. असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे काही मिनिटांत तुमच्या घरापर्यंत सामान पोहोचवतात. ऑनलाइन शॉपिंग सोयीचं असल्यामुळे लोक ऑनलाइन शॉपिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.
ऑनलाइन शॉपिंगमध्ये महिला जास्त खर्च करतात की पुरुष यावर आयआयएम-अहमदाबादने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, पुरुष सर्वाधिक ऑनलाइन खर्च करतात. (Men Spend 36 percent More Than Women in Online Shopping, Reveals IIM Study)
ऑनलाइन सर्वेक्षणात 25 राज्यांमधील 35,000 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यात असे दिसून आले की पुरुष ऑनलाइन खरेदीवर सरासरी 2,484 रुपये खर्च करतात हा खर्च महिलांनी खर्च केलेल्या 1,830 रुपयांपेक्षा 36% जास्त आहे.
आयआयएमएच्या सेंटर फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन (सीडीटी) द्वारे 'डिजिटल रिटेल चॅनल्स अॅन्ड कंज्युमर्स इंडियन पर्सपेक्टिव' हा अहवाल रविवारी प्रसिद्ध करण्यात आला.
पंकज सेटिया, स्वानंद देवधर आणि उज्ज्वल दधिच यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे दिसून आले की 47% पुरुष आणि 58% महिलांनी फॅशनवेअर खरेदी केले तर 23% पुरुष आणि 16% महिलांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी केली. (The online survey covered 35,000 respondents across 25 states)
दिल्ली, मुंबई, चेन्नई इत्यादी मोठ्या शहरांच्या तुलनेत, निम शहरांमधील ग्राहकांनी (जयपूर, लखनौ, नागपूर, कोची, इ.) 63% अधिक फॅशनवर आणि 21% अधिक ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर खर्च केला.
फॅशन आणि कपड्यांच्या उत्पादनांची मोठी खरेदी होताना दिसत आहे. निम शहरांमधील ग्राहकांचा दरडोई खर्च सर्वाधिक आहे. असे अहवालात दिसून आले आहे.
टियर-1 शहरातील ग्राहकाने खर्च केलेल्या 1,119 रुपयांच्या तुलनेत, टियर 2, 3 आणि 4 शहरातील ग्राहकांनी अनुक्रमे 1,870, 1,448 आणि 2,034 रुपये खर्च केले. 'कॅश ऑन डिलिव्हरी' हा पेमेंटचा प्राधान्यक्रम आहे. सेतिया, जे सीडीटीचे अध्यक्ष आहेत ते म्हणाले की, "कोरोना साथीच्या रोगामुळे 2020 नंतर ऑनलाइन खरेदीला चालना मिळाली."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.