Layoffs esakal
Personal Finance

Microsoft Layoffs: Microsoft मध्ये पुन्हा कर्मचारी कपात; 276 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

टेक कंपनीने या टप्प्यात एकूण 276 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे.

राहुल शेळके

Microsoft Layoffs: मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपातीची प्रक्रिया सुरू आहे. Amazon, Google, Twitter, Meta यांसारख्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक टप्प्यांत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

जानेवारीमध्ये 10,000 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा करणार्‍या मायक्रोसॉफ्ट या कंपनीने पुन्हा एकदा शेकडो कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. टेक कंपनीने या टप्प्यात एकूण 276 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे.

'या' टीममधून कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

बहुतेक प्रभावित कर्मचारी ग्राहक सेवा आणि विक्रीशी संबंधित आहेत. Geek Wire मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कंपनीने जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या 10,000 नोकर कपाती व्यतिरिक्त या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.

हे कर्मचारी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये काम करत होते. बेल्लेव्ह्यू आणि रेडमंड कार्यालयातील 210 आणि 66 कर्मचार्‍यांवर या कपातीचा परिणाम होतो.

असे कंपनीने सांगितले

गीक वायरच्या वृत्तानुसार, आगामी काळात कंपनीचे हित आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन असे निर्णय घेत राहणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की मे महिन्याच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने एकूण 158 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. ही कपात जानेवारीत प्रस्तावित केलेल्या कपातीपेक्षा वेगळी होती. याचा परिणाम वॉशिंग्टनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला.

10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांनी घोषणा केली होती की FY2023 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीतील एकूण 10,000 पदे काढून टाकली जातील. अशा परिस्थितीत, सिएटलमध्ये, कंपनीने यापूर्वी मोठ्या प्रमाणावर एकूण 2,700 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT