Microsoft Employee Sakal
Personal Finance

Microsoft Employee: चार तास काम अन् 2 कोटी पगार! कंपनीच्या 'ड्रीम जॉब'बाबत सोशल मीडियावर धुमाकूळ

राहुल शेळके

Microsoft Employee: खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करणारे लोक त्यांच्या कामामुळे आणि तणावामुळे त्रस्त असतात. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या मुलाची गोष्ट ऐकल्यानंतर लोक त्याच्या नोकरीला 'ड्रीम जॉब' म्हणत आहेत. सोशल मीडियावर या नोकरीबाबत हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

@ronawang नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, मी माझ्या मित्राशी बोलत आहे जो मायक्रोसॉफ्टमध्ये काम करतो. तो आठवड्यातून 15-20 तास काम करतो आणि उर्वरित वेळ लीग (क्लब, स्पोर्ट्स) खेळतो आणि त्यासाठी त्याला 2 कोटींहून अधिक पगार मिळतो. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आणि 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे.

चार तास कामाचा पगार पाहून लोक हैराण

एकीकडे ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवणाऱ्या व्यक्तीकडे आदराने बघितले जायचे, पण आता फक्त चार तास काम करून चांगले कमावणाऱ्या मुलाची कहाणी ऐकून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एकाने लिहिले की, जर एखादी व्यक्ती 40 तासाचे काम फक्त 20 तासांत करू शकते, तर कोणाला त्यात काय अडचण आहे?

'मी 50 तास काम करतो, मी काय करू?'

एकाने लिहिले की चांगल्या कंपन्या चांगल्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी विविध सुविधा देतात. एकाने लिहिले की, हे करण्याआधी तुम्हाला कंपनीचा विश्वास जिंकावा लागेल, जर तुम्ही विश्वास जिंकण्यात यशस्वी झालात तर तुम्ही एका महिन्यात खूप कमी वेळ काम करून चांगली कमाई करू शकता.

एकाने गमतीने लिहिले की, लोक मायक्रोसॉफ्टमध्ये आठवड्यातून 15 तास काम करतात, दिवसभर लीग खेळतात आणि 300 डॉलर कमावतात. दरम्यान, मी 50 तास काम करत आहे आणि मला जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नाही, मी काय चूक करत आहे?

केवळ मायक्रोसॉफ्टच नाही तर लोक गुगलच्या वर्क कल्चरचे कौतुक करतात. जेव्हा एका कर्मचाऱ्याने यासंबंधीचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा या सुविधा पाहून लोक या कंपनीत काम करण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Rahim Parole : मतदानाच्या तीन दिवस आधी राम रहीम जेलमधून बाहेर! विधानसभा निवडणुकीवर काय होणार परिणाम?

Govinda : "तुमच्या प्रार्थनेमुळेच ते बरे झाले" बायकोने मानले चाहत्यांचे आभार , तब्येतीविषयी म्हणाली...

Latest Marathi News Updates : पुण्यात पावसाला सुरुवात, विश्रांतवाडीसह अनेक भागांमध्ये हजेरी

ICC Test Ranking: बुमराहने अश्विनला मागे टाकत पटकावला पहिला नंबर! जैस्वाल-विराटनेही घेतली मोठी झेप

RBI MPC New Member: तुमचा EMI ठरवणाऱ्या RBIच्या समितीतील तीन नवे चेहरे कोण? व्याजदर कमी होणार का?

SCROLL FOR NEXT