Milk prices: देशात पिण्याच्या पाण्यापासून ते सिंचनापर्यंत पाण्याचे संकट अधिक गडद झाले आहे. शेतातील पिके सुकू लागली आहेत. सध्या देशातली अनेक गावांमध्ये पाण्याचे संकट सर्वाधिक असून येत्या काही दिवसांत ते वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातील 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी 4 एप्रिलपर्यंत 35% होती. उपलब्ध पाण्याची पातळी 61.8 अब्ज घनमीटर (बीसीएम) होती. ही पाण्याची पातळी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 17% कमी आणि गेल्या 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 2% कमी आहे.
दरम्यान, अधिकृत हवामान अंदाजानुसार एप्रिल-जूनमध्ये बहुतांश प्रदेशांमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहील, मध्य आणि पश्चिम द्वीपकल्पीय प्रदेशांमध्ये उष्णतेच्या लाटा सर्वात जास्त असतील.
या सोबतच पाण्याच्या संकटाचा परिणाम देशातील दुध उत्पादनावर होत आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सचे संचालक पुशन शर्मा यांनी मिंट या वृत्तपत्राला सांगितले की “या उन्हाळ्यात महाराष्ट्र, ओडिशा आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत. तसेच पाण्याच्या साठ्याच्या पातळीत घट झाल्याने सरासरीपेक्षा जास्त तापमान अपेक्षित असल्याने, जनावरांच्या वापरासाठी पाण्याची कमतरता भासणार आहे. ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.''
''उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे जनावरे जास्त वेळा आजारी पडतात आणि पाण्याच्या कमतरतेमुळे कमी पाणी पिल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे दररोज सुमारे एक लिटर उत्पादनात घट होते. त्यामुळे, जास्त संख्येने जनावरे आजारी पडल्यास दूध उत्पादनात घट होईल,” शर्मा पुढे म्हणाले.
भारतीय डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष आर.एस. सोढी यांनी या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे संघटित क्षेत्राला कमी दूध मिळणार असल्याचे सांगितले. उन्हाळ्यात पनीर, दही, बटर मिल्क आणि आईस्क्रीमची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे.
“कच्च्या दुधाच्या किमती वाढतील, परंतु ताज्या उत्पादनांवर त्याचा परिणाम होणार नाही कारण तयार उत्पादनांच्या तुलनेत या दुधाच्या किमती कमी आहेत. उन्हाळा खूप कडक असेल तर एका बाजूला उत्पादन किंवा खरेदी कमी होते आणि दुसरीकडे मागणी वाढते. चांगला साठा असलेल्या दुग्धव्यवसायांमुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकते,” सोढी पुढे म्हणाले.
ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार रविवारी अखिल भारतीय सरासरी किरकोळ आणि घाऊक दुधाची किमती 57.6 प्रति लिटर आहे. भारताने 2023-24 मध्ये 240-245 दशलक्ष टन (mt) दुधाचे उत्पादन केल्याचा अंदाज आहे, हे उत्पादन एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 4-5% जास्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.