मोबाईल उत्पादनात भरारी; मागील दहा वर्षांत २१ पटींनी वाढ Sakal
Personal Finance

Mobile Phone : मोबाईल उत्पादनात भरारी; मागील दहा वर्षांत २१ पटींनी वाढ

उत्पादनावर आधारित प्रोत्साहन फायदे देण्यासारख्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मागील दहा वर्षांत भारतात मोबाईल फोनच्या उत्पादनात २१ पटींनी वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्पादनावर आधारित प्रोत्साहन फायदे देण्यासारख्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मागील दहा वर्षांत भारतात मोबाईल फोनच्या उत्पादनात २१ पटींनी वाढ झाली आहे. एकूण मूल्याचा विचार करता हे उत्पादन ४.१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचे ‘इंडियन सेल्युलर अँड इकॉनॉमिक असोसिएशन’ने एका निवेदनाद्वारे सांगितले.

या उत्पादनवाढीमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्याही भारतात गुंतवणूक करत असून, त्यामुळे स्थानिक पातळीवरील उत्पादनाला बळ मिळत आहे, असे ‘आयसीईए’ने सांगितले आहे. ‘आयसीईए’ने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील मोबाईल फोनच्या मागणीपैकी ९७ टक्के गरज देशांतर्गत उत्पादनातूनच भागविली जात आहे.

तसेच, २०२४ या वर्षात तर होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी ३० टक्के उत्पादनाची निर्यात होणार आहे. निर्यात वाढण्यामागे ॲपल आणि सॅमसंग या कंपन्यांनी मोलाची भर टाकली आहे. या कंपन्यांनी भारतात बनविलेले फोन ब्रिटन,

नेदरलँड, ऑस्ट्रिया, इटली, आखाती देश, दक्षिण अमेरिका खंड आणि उत्तर आफ्रिकेत निर्यात केले जातात. मागील दहा वर्षांत भारतात २४५ कोटींहून अधिक मोबाईल फोन संचांचे उत्पादन झाले आहे.

मोबाईल फोनचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने २०१७ वर्षीच्या मे महिन्यात ‘फेझ्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्रॅम’ जाहीर केला होता. यामुळे या उद्योगाला पूरक वातावरण आणि यंत्रणा निर्माण होण्यास मदत झाली.

त्यामुळे दहा वर्षांपूर्वी मोबाईल फोन उत्पादनाच्या केवळ दोन कारखाने असणारा भारत आज या क्षेत्रात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे, असे ‘आयसीईए’ने म्हटले आहे. भारताच्या उत्पादनावर आधारित प्रोत्साहन फायदे देण्याच्या धोरणामुळे फॉक्सकॉन,

पेगाट्रॉन, रायझिंग स्टार आणि विस्ट्रॉनसारख्या विदेशी कंपन्यांनी भारतात उत्पादन करण्यास सुरुवात केली. सॅमसंगसारख्या कंपनीनेही नोएडामध्ये त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा कारखाना सुरू केला.

उत्पादनवाढ (कोटी रुपयांत)

२०१४-१५

१८,९०० - उत्पादन मूल्य

१,५५६ - एकूण निर्यात

२०२३-२४

४,१०,००० - उत्पादन मूल्य

१,२०,००० - एकूण निर्यात

वाढीचे प्रमाण (२०१४ च्या तुलनेत)

२०००% - उत्पादन मूल्यातील वाढ

७५००% - निर्यातीत वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT