Ircon OFS: केंद्र सरकार सरकारी कंपनीतील हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. रेल्वेशी संबंधित कंपनी IRCON इंटरनॅशनलमधील 8 टक्के स्टेक विकला जाणार आहे. इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये आज 9 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
त्यामागचे कारण म्हणजे भारत सरकार कंपनीचे 7 ते 8 डिसेंबर दरम्यान OFS (ऑफर-फॉर-सेल) च्या माध्यमातून IRCON इंटरनॅशनलमधील 8 टक्के म्हणजेच 7.52 कोटी शेअर्सची विक्री करत आहे. त्यामुळे आज सकाळी RCON चे शेअर्स BSE वर 157.95 आणि NSE वर 158 च्या घसरणीसह उघडले.
गेल्या 6 महिन्यांत इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअरची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. एका वर्षात स्टॉकमध्ये 165 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. IRCON इंटरनॅशनलच्या शेअर्सचा BSE वर 179.90 आणि NSE वर 180 असा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
सुमारे 1,100 कोटी रुपये सरकारी तिजोरीत येतील
जर विक्री यशस्वी झाली, तर सरकारी तिजोरीत सुमारे 1,100 कोटी रुपये जमा होतील. सरकारकडे सध्या रेल्वे अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी IRCON मध्ये 73.18 टक्के हिस्सा आहे.
चालू आर्थिक वर्षात, सरकारने आतापर्यंत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील हिस्सा विकून 8,859 कोटी रुपये उभे केले आहेत. 2023-24 च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीतून 51,000 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.