नवी दिल्ली, ता. २१ ः जगातील एक महत्त्वाचे स्टार्टअप केंद्र म्हणून भारताने ओळख मिळविली आहे. मात्र, आर्थिक अडचणीमुळे देशातील १००हून अधिक स्टार्टअप कंपन्यांनी यंदा १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे.
‘लेऑफ डॉट एफवायआय’ कंपनीच्या अहवालानुसार, रोख भांडवलाची टंचाई निर्माण झाल्याने अडचणीत असलेल्या बायजूजने यावर्षी दुसऱ्या फेरीत अडीच हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले.
या वर्षी शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणाऱ्या स्टार्टअपमध्ये ओला, कॅप्टन फ्रेश, शेअरचॅट आदींचा समावेश आहे, तर स्विगी, मेडीबडी, डिलशेअर, मायगेट, पॉलिगॉन, सॅपलॅब्स, अपग्राड, डंझो, झेस्ट मनी, सिम्पल, मीशो, क्युमॅथ, मिल्कबास्केट आदी अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमी केले आहेत.
जागतिक स्तरावर ११६० हून अधिक कंपन्यांनी यावर्षी २६ लाख दोन हजार २३८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या वर्षी १०६४ कंपन्यांनी एक लाख ६४ हजार ९६९ कर्मचाऱ्यांना कमी केले होते. निधीची कमतरता जाणवू लागल्याने, स्टार्टअपनी खर्चात कपात करण्यासाठी कर्मचारी कमी करण्याची भूमिका घेतली आहे.
‘ग्लोबलडेटा’च्या अहवालानुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान भारतीय स्टार्टअपना मिळालेल्या निधीमध्ये ६५.८ टक्के घसरण झाली आहे. या वर्षी, भारतीय स्टार्टअपनी १०१३ व्हेंचर कॅपिटलकडून ६.९ अब्ज डॉलर उभे केले.
गेल्या वर्षी, भारतीय स्टार्टअपनी केवळ चार महिन्यांत १० अब्ज डॉलरपेक्षा अधिक निधी मिळविला होता. भारतातील युनिकॉर्न स्टार्टअपची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. २०२२ मध्ये २४ युनिकॉर्न कंपन्या होत्या. या वर्षी फक्त दोनच कंपन्यां आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.