Mukesh Ambani Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: दिल्ली NCRमध्ये अंबानींचा मोठा प्रकल्प, 8 हजार एकरमध्ये वसवणार जागतिक दर्जाचे शहर

हे शहर आठ हजार एकर जागेवर उभारले जात आहे.

राहुल शेळके

Mukesh Ambani: केवळ भारतच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी दिल्ली एनसीआरजवळ एक मोठा प्रकल्प उभारत आहेत. या भागात ते जागतिक दर्जाचे शहर उभारणार आहेत. ही एक प्रकारची स्मार्ट सिटी असेल.

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप आपली स्मार्ट सिटी बनवणार आहे. दिल्ली एनसीआरचे मोठे आर्थिक क्षेत्र असलेल्या गुडगावजवळ हरियाणातील झज्जर येथे एमईटी सिटी बांधण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथे ग्रीनफिल्ड सिटी विकसित करण्यात येत आहे. हे शहर आठ हजार एकर जागेवर उभारले जात आहे. 220 KV पॉवर सबस्टेशन, पाणी पुरवठा नेटवर्क आणि ट्रीटमेंट प्लांट आणि रस्त्यांचे जाळे यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा आधीच अस्तित्वात आहेत.

नवीन रिलायन्स स्मार्ट सिटीला 4 जपानी कंपन्यांचे नवीन घर देखील म्हटले जाऊ शकते कारण त्यात निहोन कोहेन, पॅनासोनिक, डेन्सो आणि टी-सुझुकी सारख्या जपानी दिग्गज कंपन्या असतील. निहोन कोहेनचे उत्पादन युनिट हे भारतातील सर्वात मोठे उत्पादन युनिट असेल.

MET सिटी ही जपानी औद्योगिक टाउनशिप देखील आहे. या प्रकल्पाबाबत मेट सिटीचे सीईओ एसव्ही गोयल म्हणाले की, कंपनीचे 400 हून अधिक औद्योगिक ग्राहक आहेत. उत्तर भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ग्रीनफिल्ड स्मार्ट शहरासाठी कंपनीने मास्टरप्लॅन तयार केला आहे.

या सुविधा शहरात असतील

नवीन रिलायन्स सिटीच्या प्रमुख ठळक वैशिष्ट्यांमध्ये दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि क्षेत्रातील इतर शहरांशी मोठी कनेक्टिव्हिटी तयार करणार आहे. हे शहर कुंडली मानेसर पलवल (KMP) एक्सप्रेसवे आणि नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्थित आहे.

MET सिटी वेबसाइटनुसार, विकासासाठी जमीन पूर्णपणे तयार आहे. शैक्षणिक सुविधेच्या बाबतीत, SGT विद्यापीठ आणि माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा शैक्षणिक परिसर सेहवाग स्कूल शहराच्या अगदी जवळ आहे आणि एम्स सुविधा MIT शहराच्या अगदी जवळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT