Mukesh Ambani Latest News 
Personal Finance

Mukesh Ambani : अंबानींच्या घरी आनंदी आनंद... मुलाच्या लग्नाआधी रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल; पाचच दिवसात कमवले 'इतके' कोटी

Mukesh Ambani Latest News : मुकेश अंबानी यांच्या घरी काही दिवसात लग्न सोहळा होणार आहे, त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

रोहित कणसे

Mukesh Ambani Latest News : मुकेश अंबानी यांच्या घरी काही दिवसात लग्न सोहळा होणार आहे, त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. यापूर्वी प्री वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. या आनंदाच्या काळात रिलायन्ससाठी देखील सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात टॉप १० कंपन्यांमध्ये एक नंबरवर असलेल्या रिलायन्सने जबरदस्त कमाई केली आहे. शेअर बाजारात पाच दिवसात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ४०,००० कोटींची वाढ झाली आहे. (mukesh ambani reliance industries investors earn more than 40000 crore)

मागील आठवड्यात सेंसेक्सच्या टॉप दहा पैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायजेशन (Market Cap)मध्ये मोठी वाढ झाली आहे. या कंपन्याचे एकूण एमकॅप १,१०,१०६.८३ कोटी रुपायांची वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फायदा मुकेश अंबानी य़ांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Mukesh Ambani Reliance) कंपनीला झाला आहे. रिलायन्स शेअर होल्डर्सनी पाचच दिवसात ४३,९७६.९६ कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये सुरू असलेली तेजी दरम्यान रिलायन्सचे मार्केट कॅप मागील आढवड्यात वाढून २०,२०,४७०.८८ कोटी रुपयांवार पोहचले आहे.

रिलायन्स व्यतिरीक्त आपल्या गुंतवणूकदारांचा फायदा करून देणाऱ्या कंपन्यांमध्ये आयसीआसीआय बँकेचा देखील समावेश आहे. ICICI Bank MCap वाढून ७,४४,८०८.७२ कोटी रुपये झाला आहे. त्यामुळे या बँकेच्या शअरमध्ये गुंतवणूक केलेल्याना आठवडाभरात २७,०१२.४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यानंतर एलआयसीचा नंबर लागतो. LIC मार्केट कॅप ही १७, २३५.६२ कोटी इतकी वाढून ६,७४,६५५.८८ कोटी झाली आहे. आयटीसी च्या मार्केट व्हॅल्यूमध्ये देकील वाढ झाली असून ती ५,१३,६४०.३७ कोटी झाली आहे. हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेडने पाच दिवसात ४,५३४.७१ कोटींची कमाई केली आहे या कंपनीचं मार्केट कॅपेटलायजेशन वाढून ५,६२,५७४.३८ कोटी रुपयांवर पोहचलं आहे.

आयटी कंपन्यांत गुतवणूक करणाऱ्यांना तोटा

मागील काही दिवसात टाटा ग्रुपची कंपनी टीसीएस आणि इंफोसिसच्या गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात कंपन्याचं मार्केट कॅप एकत्रितपणे ३८,४७७.४९ रुपयांनी कंमी झाले आहे. टीसीएस मार्केट कॅप कमी होऊन २७,९४९.७३ कोटींहून १४,६६,०३०.९७ कोटी रुपयांवर आलं आहे. तर इन्फोसीस मार्केट कॅप १०,५२७.७६ कोटीहूम कमी होऊन ६,९६,०४५.३२ कोटी झालं आहे.

सेंसेक्सच्या टॉप दहा कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स पहिल्या स्थानावर कायम राहिली. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय, एलआयसी, भारती एअरटेल, हिंदुस्तान यूनिलीवर आणि आयटीसी या कंपन्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

Wardha Vidhan Sabha Voting: वर्ध्यात निलेश कराळे मास्तरांना मारहाण; Video Viral

Assembly Election Voting 2024: मतदान अधिकारी म्हणाला, कमळाचे बटण दाबा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

Assembly Election: मतदानासाठी केंद्रावर आले, मतपेटीवरील बटन दाबताच... गावात हळहळ, काय घडलं?

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

SCROLL FOR NEXT