Mukesh Ambani returns to 100 Billion Dollar club amid Reliance share surge  Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: मुकेश अंबानींनी केला नवीन विक्रम; 100 बिलियन डॉलर क्लबमध्ये केला प्रवेश

Asia Richest Man Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत नवे स्थान मिळवले आहे. मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये प्रवेश केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ हे मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण आहे.

राहुल शेळके

Asia Richest Man Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत नवे स्थान मिळवले आहे. मुकेश अंबानी यांनी 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये प्रवेश केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ हे मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण आहे. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांनी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 2.76 बिलियन डॉलर कमावले, ज्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 102 बिलियन डॉलर झाली. ते सध्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या स्थानावर आहे. जगात फक्त 12 अब्जाधीश आहेत ज्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलर्स आहे.

गुरुवारी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. बाजार बंद होईपर्यंत कंपनीचे शेअर्स 2.58 टक्क्यांच्या वाढीसह 2,718.40 रुपयांवर पोहोचले होते. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या शेअर्सनी देखील 2,724.95 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.

शुक्रवारी देखील कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे आणि कंपनीच्या शेअर्सने 2736.70 रुपयांची नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 18.50 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. तज्ञांच्या मते, कंपनीचे मार्केट कॅप येत्या काही दिवसांत 20 लाख कोटींच्या पुढे जाऊ शकते.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी 19 महिन्यांनंतर पुन्हा 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये दिसले आहेत. 9 जून 2022 पर्यंत, मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 2 अब्ज डॉलर होती.

तेव्हापासून मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या खाली होती. एका वर्षानंतर, 20 जुलै 2023 रोजी मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचले होते. आता 6 महिन्यांनंतर मुकेश अंबानी यांची संपत्ती 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT