Mukesh Ambani’s Reliance Industries mulls Rs 20,000 crore bond sale  Sakal
Personal Finance

रिलायन्स इंडस्ट्रीज करणार देशातील सर्वात मोठी बाँड विक्री, 20 हजार कोटी रुपये उभारण्याचा प्लॅन

Reliance Industries Bond Sale: रिलायन्स इंडस्ट्रीजने बाँड विकून 20 हजार कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल शेळके

Reliance Industries Bond Sale:

रिलायन्स इंडस्ट्रीजने बाँड (रोखे) विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रोखे विक्रीद्वारे कंपनी बाजारातून अंदाजे 20 हजार कोटी रुपये जमा करणार आहे. 2020 नंतर पहिल्यांदाच रिलायन्सकडून असे पाऊल उचलले जात आहे.

हे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) इलेक्ट्रॉनिक बुक मेकॅनिझम अंतर्गत 09 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत BSE च्या बाँड प्लॅटफॉर्मवर विकले जातील. असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

नॉन-बँकिंग भारतीय कॉर्पोरेटकडून सर्वात मोठी ऑफर

जर रिलायन्सने या रोखे विक्रीद्वारे 20 हजार कोटी रुपये उभे केले तर ते कोणत्याही बिगर बँकिंग आणि वित्तीय भारतीय कॉर्पोरेटचे सर्वात मोठे यश असेल. यापूर्वी, एचडीएफसी बँकेत विलीनीकरणापूर्वी एचडीएफसीने रोख्यांद्वारे 25 हजार कोटी रुपये उभे केले होते.

एप्रिल 2020 मध्ये 5 वर्षांचे रोखे जारी करून रिलायन्सकडून 2,795 कोटी रुपये उभे करण्यात आले होते. नवीन रोख्यांमधून मिळालेल्या पैशाचा वापर नुकत्याच झालेल्या कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केला जाईल. रोखे जारी करण्याचा हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा रिलायन्स जिओ देशभरात 5G सेवेचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे.

स्थानिक चलन रोखे म्हणजे काय?

स्थानिक चलन रोखे सहसा त्यांच्या स्वतःच्या देशातील सरकार, कॉर्पोरेशन किंवा इतर संस्थांद्वारे जारी केले जातात. त्यांची मुद्दल आणि व्याज स्थानिक चलनात दिले जाते.

उदाहरणार्थ, जर एखादी कंपनी भारतात असेल, तर ती रुपयात व्याज देईल आणि मूळ रक्कमही रुपयात असेल. स्थानिक चलन रोखे विदेशी चलन रोख्यांपेक्षा थोडे वेगळे आहेत. विदेशी चलन रोख्यांमध्ये, मुद्दल आणि व्याज विदेशी चलनात दिले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT