Mutual Fund sakal
Personal Finance

म्युच्युअल फंडातील ‘जय-वीरू’

फ्रँकलिन टेंम्पल्टन इंडिया ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे फ्रँकलिन इंडिया ब्ल्यूचिप फंड आणि फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंड हे दोन फंड गेली तीस वर्षे ‘जय-वीरू’सारखी धमाकेदार कामगिरी करत आहेत.

डॉ. वीरेंद्र ताटके

डिसेंबर १९९३ मध्ये बाजारात आलेले फ्रँकलिन टेंम्पल्टन इंडिया ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे फ्रँकलिन इंडिया ब्ल्यूचिप फंड आणि फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंड हे दोन फंड गेली तीस वर्षे ‘जय-वीरू’सारखी धमाकेदार कामगिरी करत आहेत. तीस वर्षांपूर्वी एकाच महिन्यात बाजारात आलेले हे दोन फंड आजही तेवढेच आकर्षक ठरत आहेत.

उत्तम कामगिरी

कोठारी पायोनियर ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने डिसेंबर १९९३ मध्ये हे दोन फंड बाजारात आणले होते. कालांतराने या कंपनीचे ‘फ्रँकलिन टेंम्पल्टन’ या कंपनीत विलीनीकरण झाले. हे फंड बाजारात आले, तेव्हा भारतीय म्युच्युअल फंड व्यवसाय अगदी बाल्यावस्थेत होता. गुंतवणूकदारांची संख्या, गुंतवणुकीची रक्कम, भारतीय म्युच्यअल फंड व्यवसायाची एकूण मालमत्ता या सर्वच गोष्टी आजच्या तुलनेत नगण्य होत्या.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी जागरूकताही कमी होती. मात्र, या दोन्ही फंडांनी गेल्या तीस वर्षांत भारतीय शेअर बाजारातील सर्व चढ-उतारांचा यशस्वीरीत्या मुकाबला करत, सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारावर दीर्घकाळात उत्तम परतावा दिला आहे.

फ्रँकलिन इंडिया ब्ल्यूचिप फंड

फ्रँकलिन इंडिया ब्ल्यूचिप फंड हा प्रामुख्याने मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाची प्रमुख गुंतवणूक बँकिंग, वाहन आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये आहे. विशेष म्हणजे गेल्या २० वर्षांत प्रत्येक वर्षी गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची किमया या फंडाने साधली आहे. तुलनेने कमी जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवण्याचा उद्देश असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य आहे.

या फंडामध्ये ज्यांनी अगदी सुरुवातीला गुंतवणूक केली होती, त्यांना आता आकर्षक परतावा मिळताना दिसत आहे. उदा. १९९३ मध्ये या फंडात एकरकमी गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे सध्याचे बाजारमूल्य साधारण दोन कोटी सहा लाख रुपये आहे. या फंडात ‘एसआयपी’ गुंतवणुकीद्वारे नियमित गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनासुद्धा उत्तम परतावा मिळाला आहे.

फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंड

फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंडदेखील डिसेंबर १९९३ मध्ये बाजारात आला होता. हा फंड प्रामुख्याने मिड कॅप कंपन्या अर्थात मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाची प्रमुख गुंतवणूक बँकिंग, वाहन व औषध कंपन्यांच्या शेअरमध्ये आहे. या फंडानेदेखील गेल्या २० वर्षांत प्रत्येक वर्षी गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे.

थोडी अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवण्याची अपेक्षा करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य आहे. या फंडात १९९३ मध्ये एकरकमी एक लाख रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना आता साधारण दोन कोटी वीस लाख रुपये मिळतील. ‘एसआयपी’ गुंतवणूकदारांनादेखील उत्तम परतावा मिळाला आहे.

म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेत दीर्घकाळासाठी एकरकमी किंवा नियमितपणे ‘एसआयपी’ गुंतवणूक केली, तर आश्चर्यकारक परतावा मिळतो, हे या ‘जय-वीरू’च्या जोडीने सिद्ध केले आहे.

(डिस्क्लेमर : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत आणि यासंदर्भात तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरते.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT