Mutual Fund Investment Sakal
Personal Finance

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे का? गुंतवणूक करताना अशी घ्या काळजी

राहुल शेळके

Mutual Fund Investment: भारतातील तीन टक्के नागरिकच फक्त शेअर मार्केट अथवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात. तरीही शेअर मार्केट नवनवीन विक्रम करत आहे. ही आकडेवारी पाच टक्क्यावर गेल्यास शेअर मार्केट अजून झपाट्याने वाढणार आहे. अनेकांनी यामध्ये गुंतवणूक करणे अद्यापही जोखमीचे वाटते.

त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे. कारण म्युच्युअल फंड म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरित्या शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात. त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो.

आजकाल गुंतवणूक करण्यासाठी चांगला परतावा देणारा आणि जोखीम नसलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचे आहे का? याबाबत अनेक शंका घेतल्या जातात.

गुंतवणुकीचा वाढता कल

आपल्या कष्टातून मिळवलेल्या पैशांची बचत करून योग्य गुंतवणूक करण्याचा सुरक्षित पर्याय म्हणून म्युच्युअल फंडाकडे पाहण्याचा कल वाढत आहे. कारण इथे बँकेतील व्याजापेक्षा जास्त परतावा यात मिळतो.

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

दरमहा अगदी किमान ठराविक रक्कम भरूनही यात गुंतवणूक करता येते. आपल्यापैकी अनेकजण म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूकही करत असतील, मात्र आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांना म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय याची माहिती नसते.

म्युच्युअल फंडाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा म्हणजे फंड मॅनेजर. हा फंड मॅनेजर विविध म्युच्युअल फंडातील योजना तो गुंतवणूकदारांसमोर सादर करतो. त्यातील विविध शेअर्समध्ये तो गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवितो.

एकाचवेळी अनेकांकडून हे फंड गोळा केले जातात. योग्यवेळी लाभांशाच्या टक्केवारीप्रमाणे ते गुंतवणूकदारांना परताव्याच्या रूपात दिले जातात.

म्युच्युअल फंडाचे प्रकार

म्युच्युअल फंड प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात-इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड, आणि संतुलित म्युच्युअल फंड. यापैकी एक म्युच्युअल फंड गुंतवणूक निवडणे गुंतवणूकदारांसाठी त्रासदायक ठरू शकते. गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट म्युच्युअल फंड निवडण्यासाठी, म्युच्युअल फंडाची कामगिरी, म्युच्युअल फंड पाहण्याची सूचना केली जाते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

म्युच्युअल फंडावर सेबीचे संपूर्ण नियंत्रण असते. म्युच्युअल फंडातील ओपन-एन्डेड योजनेमधून कधीही पैसे काढता येतात. अगदी एसआयपी सुरू ठेवूनही जमा शिल्लकीतील काही रक्कम काढण्याची सोय असते. क्लोज एन्डेडमध्ये मात्र हा पर्याय उपलब्ध नसतो.

गुंतवणूकदाराला काही आर्थिक अडचण आल्यास काही महिन्यांकरिता एसआयपी स्थगित करता येते. एक साधा फॉर्म भरून तीन ते सहा महिने एसआयपी थांबवता येते. म्युच्युअल फंड योजनांना भांडवली लाभावरील कर आणि लॉक-इनचे नियमही लागू होतात.

एकरकमी गुंतवणुकीला तसेच एसआयपीलादेखील तीन वर्षांची मुदत अनिवार्य असते. त्या आधी त्यातील गुंतवणूक काढून घेता येत नाही. कर बचतीचा लाभदेखील म्युच्युअल फंड योजनांवर घेता येतो.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Diwali Recipe : दिवाळीत नुसता चिवडा बेचव लागतो, विकतची कशाला घरी अशी बनवा कुरकुरीत शेव

SCROLL FOR NEXT