mutual fund investment Risk management is the key to investing Sakal
Personal Finance

जोखीम व्यवस्थापन गुंतवणुकीची गुरुकिल्ली

इक्विटी म्युच्युअल फंड विभागातील एक श्रेणी ही लार्ज आणि मिड कॅप फंड अशी आहे. दीर्घकाळासाठी निर्धारीत आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यास हा पर्याय निश्चितच सक्षम

सकाळ वृत्तसेवा

- तुषार शेठ

गुं तवणूकदारांनी नेहमीच धोक्यांबाबत दक्ष राहून, जोखीम कमी करून उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा विचार करावा. जोखीम व्यवस्थापन हीच यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोखीम व्यवस्थापन योग्यरित्या केले गेले, तर दीर्घकालीन संपत्ती निर्माण हा एकमेव परिणाम त्यातून दिसून येईल.

वैविध्य आणि मालमत्ता वाटप धोरण जोखीम कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळे संपत्तीनिर्मितीचा प्रवास योग्य रूळावर ठेवण्यास मदत होते. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून दीर्घकाळात चांगली संपत्ती निर्माण करता येऊ शकते.

ज्यांना नियमितपणे शेअर बाजाराचा मागोवा घेता येत नाही, परंतु या गुंतवणूक पर्यायाचा फायदा घेण्याची इच्छा आहे. त्यांना इक्विटी म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवणूक करून हा लाभ घेता येईल. त्यांच्यासाठी हा ध्येय-केंद्रित संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरेल.

लार्ज आणि मिड कॅप फंड

इक्विटी म्युच्युअल फंड विभागातील एक श्रेणी ही लार्ज आणि मिड कॅप फंड अशी आहे. दीर्घकाळासाठी निर्धारीत आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यास हा पर्याय निश्चितच सक्षम आहे. या ओपन-एंडेड योजनेतून मोठे बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये; तसेच मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.

स्थिर परताव्यासाठी गुंतवणूकदार लार्ज-कॅप फंडांतील गुंतवणुकीकडे वळतात. परंतु, हेही तितकेच खरे आहे, की पोर्टफोलिओमध्ये जास्त स्थिरता मिळवण्याच्या नादात, ते अनेकदा बाजारातील इतर वाढीच्या संधी गमावतात. मिड-कॅप फंड हे मिड-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, लार्ज-कॅपपेक्षा तुलनेने ही गुंतवणूक जोखीमपूर्ण असली, तरी दीर्घकाळापर्यंत अतिरिक्त वाढ हीच गुंतवणूक करते.

अनेक मिड-कॅप हे पुढील काही वर्षांमध्ये लार्ज-कॅप बनण्याच्या प्रक्रियेत असल्याने, एकंदर पोर्टफोलिओ वाढीची शक्यता जास्त आहे आणि त्याचप्रमाणे मूल्यनिर्मितीदेखील होणार आहे. अशा शेअरमध्ये लवकर गुंतवणूक करणे आणि त्यांच्या वाढीचा भाग बनणे निश्चितच शहाणपणाचे ठरते. त्यामुळेच लार्ज आणि मिड-कॅप फंडातील गुंतवणूक अतिशय समर्पक ठरते.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड-कॅप फंड ही अशी योजना आहे, जी लार्ज-कॅप आणि मिड-कॅपमध्ये प्रत्येकी किमान ३५ टक्के निधी वाटप करते. अशाप्रकारे मिड-कॅपच्या समावेशातून वाढ साध्य केली जाते आणि लार्ज-कॅपमुळे गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ तुलनेने स्थिर ठेवला जातो.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड-कॅप फंड हा वेगवेगळ्या बाजारचक्रांमध्ये स्थिर कामगिरी करणाऱ्यांपैकी एक फंड आहे. जे गुंतवणूकदार दीर्घकालीन वाढीची क्षमता शोधत आहेत आणि पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणुकीची तयारी आहे, ते या योजनेचा विचार करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT