Mutual Fund SEBI relaxes KYC norms to simplify risk management framework Check details  Sakal
Personal Finance

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

राहुल शेळके

SEBI KYC Norms: बाजार नियामक सेबीने करोडो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. SEBI ने KYC नियमांमध्ये नुकतेच लागू केलेले बदल शिथिल केले आहेत. एक कोटीहून अधिक गुंतवणूकदारांना याचा फायदा होणार आहे.

यापूर्वी सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी केवायसी नियम कडक केले होते. नियामकाने केलेल्या बदलांमुळे, अनेक गुंतवणूकदारांना पुन्हा केवायसी करणे आवश्यक होते. हे नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू झाले आणि नवीन KYC न करणाऱ्या गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंड खाती होल्डवर ठेवण्यात आली होती.

अपूर्ण केवायसीमुळे सुमारे 1.3 कोटी म्युच्युअल फंड खाती रोखून धरण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. केवायसी नोंदणी एजन्सींनी असे म्हटले होते की गुंतवणूकदारांनी सुरुवातीला केवायसी प्रक्रियेत जी कागदपत्रे वापरली होती ती आता वैध नाहीत किंवा त्यांनी आधारद्वारे केवायसी पूर्ण केले नाही, ज्यामुळे त्यांची खाती होल्डवर ठेवण्यात आली आहेत. अशा गुंतवणूकदारांना सेबीच्या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

म्युच्युअल फंड खाते असलेले अनिवासी भारतीय किंवा भारताबाहेर इतर कोणत्याही देशात राहणाऱ्या गुंतवणूकदारांना अधिक समस्या निर्माण होत होत्या. त्याच्या म्युच्युअल फंड खात्यातून त्याला पैसे काढता आले नाहीत कारण त्यांचे खाते होल्डवर ठेवण्यात आले होते. आता KRA कडून पडताळणी केल्यानंतर, KYC झाली असे मानले जाऊ शकते आणि खात्यावरील होल्ड काढला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT