Nagpur Butibori solar panel project went to Gujarat Sakal
Personal Finance

Nagpur Project: आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर! फडणवीसांच्या नागपुरातील 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला जाणार

राहुल शेळके

Nagpur Project: महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये देशातील सर्वात मोठ्या रिन्यूएबल अॅण्ड ग्रीन एनर्जी कंपनीचा (रिन्यू) सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय उदासीनता आणि अधिकाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडल्याने हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात उद्योगांकडून आकारण्यात येणारे सर्वाधिक वीजदर, हे प्रकल्प जाण्याचे मुख्य कारण समजले जात आहे.

18 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात 300 एकर जागेवर उभारण्यात येणार होता. या प्रकल्पातून 3 हजार युवकांना रोजगार देण्याची कंपनीची योजना होती. पण हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्यामुळे आता स्थानिक युवकांना रोजगारासाठी दुसऱ्या प्रकल्पाची वाट पाहावी लागणार आहे.

गुजरात आणि इतर राज्यांमध्ये मोठी गुंतवणूक आणि प्रकल्प गमावल्याबद्दल एकनाथ शिंदे सरकारवर विरोधक आधीच टीका करत आहेत. विरोधी पक्ष, विशेषत: ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट या गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पाचे श्रेय मुख्यमंत्री शिंदे यांच्या नाकर्तेपणाला देत आहे.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. या घडामोडीने विरोधकांना पुन्हा एकदा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे बोट दाखवण्याची संधी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT