Navratri Economic sakal
Personal Finance

नवरात्रीची ‘अर्थ’पूर्ण रूपे

सध्या नवरात्रीचा पवित्र उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा होत आहे. नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचे नऊ दिवस!

डॉ. वीरेंद्र ताटके

सध्या नवरात्रीचा पवित्र उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा होत आहे. नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचे नऊ दिवस! आधुनिक जीवनात अत्यावश्यक झालेले आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठीदेखील या उत्सवातून आपण नक्कीच काही धडे घेऊ शकतो.

या नऊ दिवसांत आदिशक्ती विविध नऊ रूपे धारण करते, ज्या रूपांना एकत्रित ‘नवदुर्गा’ असे संबोधतात. ही नऊ रुपे आणि त्यातून मिळणारा संदेश आपण जाणून घेऊ या.

शैलपुत्री - भटकणारे मन या देवीच्या स्मरणाने खंबीर आणि शांत होण्यास मदत होते. आर्थिक प्रगती साधण्यासाठी खंबीर आणि शांत मन अत्यंत आवश्यक असते.

ब्रह्मचारिणी - देवीचे हे रूप आपल्याला सुचवते की, जेवढे तुम्ही अलिप्त व्हाल तेवढे आनंदी आणि तणावमुक्त व्हाल. आर्थिक प्रगतीसाठी असे अलिप्त आणि तणावमुक्त मन अत्यावश्यक असते.

चंद्रघंटा - आदिशक्तीच्या या तिसऱ्या रूपाच्या स्मरणाने आपले मन सजग होऊन ते आपल्या नियंत्रणात येते अशी धारणा आहे.

कुष्मांडा - देवीचे हे रूप आपल्याला नवनिर्मितीची ऊर्जा देत असते. आपल्या आयुष्यात आर्थिक प्रगती साधण्यासाठी वेळोवेळी अशा नवनिर्मितीची आपल्याला आवश्यकता असते.

स्कंदमाता - देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात. आर्थिक प्रगती करत असताना कौशल्य आणि शौर्यासह काही वेळा निरागसता आणि करुणा असल्यास आपण आपल्या प्रगतीबरोबर समाजाचीदेखील सेवा करू शकतो.

कात्यायनी - आयुष्यातील प्रगतीसाठी आवश्यक असलेले संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा हे चार गुण आपल्याला कात्यायनी देवी देते.

कालरात्री - सातव्या दिवसाचे प्रतीक असलेली कालरात्री देवी आपल्याला कार्यक्षम होण्यासाठी थोडी विश्रांती घेण्याची सूचना देते. आर्थिक प्रगती साधत असताना अशी अल्पकालीन विश्रांती अधूनमधून आवश्यक असते.

महागौरी - आठवा दिवस महागौरी देवीचा आहे. विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ असलेली देवी आपल्याला लहान मुलाप्रमाणे सतत नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त करते.

सिद्धीदात्री - नववा दिवस सिद्धीदात्री देवीचा मानला जातो. ‘जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीदात्री’ अशी श्रद्धा आहे. आर्थिक प्रगतीसाठी केवळ शुद्ध मार्गांचा अवलंब करणे आणि केवळ हितकारक गोष्टी ऐकणे; तसेच अफवा पसरविणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे आवश्‍यक आहे.

पैसे मिळवण्यासाठी गैरमार्गांचा उपयोग न करणे असे व्रतदेखील या नवरात्रीच्या निमित्ताने आपण सुरू करू शकतो. ‘नवदुर्गे’ची ही विविध रूपे आठवून वाईट गोष्टींवर ‘अर्थ’पूर्ण विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करून आपण हा उत्सव साजरा करू या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT