People Considering Leaving Their Jobs: पूर्वी एखाद्या कंपनीत 5 ते 8 वर्षे काम करणे ही सामान्य गोष्ट होती, पण आता एकाच कंपनीत 15 ते 18 महिने काम करणे ही मोठी गोष्ट झाली आहे. एखाद्या कंपनीत 18 महिने सतत काम करणे हा आता दीर्घकालीन (नोकरीचा कार्यकाळ) कालावधी मानला जात आहे.
वारंवार नोकऱ्या बदलणे आता एक ट्रेंड बनला आहे. कर्मचारी आणि कंपनी मॅनेजर देखील हे मान्य करू लागले आहेत की एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीत दीर्घकाळ टिकवून ठेवणे अशक्य आहे.
मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइनच्या नवीन संशोधनात असे भाकीत केले आहे की, 2024 मध्ये आणखी लोक त्यांच्या नोकऱ्या सोडण्याची योजना आखत आहेत. जवळपास निम्मे (46%) कर्मचारी म्हणत आहेत की, ते पुढच्या वर्षी नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत.
मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइनच्या नवीन संशोधनानुसार, फेब्रुवारी ते मार्च 2024 दरम्यान 31 देशांमधील 30,000 हून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले आहे. 2021च्या तुलनेत कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे, असे या संशोधनातून समोर आले आहे.
काही मोठ्या कंपन्या नोकऱ्यांमध्ये कपात करत असूनही, कोविड-19च्या तुलनेत बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे. 2024 च्या सुरुवातीपासून नोकरीची वाढ चांगली आणि स्थिर आहे. असे संशोधनातून समोर आले आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभरात महागाई वाढली आहे आणि त्यामुळे कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. गेल्या 2 वर्षांत भारतासह जगभरातील मध्यवर्ती बँकांनीही व्याजदर वाढवले आहेत. महागाईमुळे वाढलेल्या या व्याजदरांमुळे जगाची आर्थिक गती मंदावली आहे, त्यामुळे बेरोजगारीही वाढली आहे.
त्यामुळे वाढलेली महागाई काही कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी शोधण्यास भाग पाडत आहे. फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अटलांटा कडील डेटानुसार, नोकरी बदलणाऱ्यांचा पगार अधिक वेगाने वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.