New Age Gold ideal answer to saving fund esakal
Personal Finance

New Age Gold : 'न्यु एज गोल्ड', बचतीचा नवा फंडा? काय आहे जाणून घ्या!

पारंपरिक गोल्ड ज्वेलरी व लक्झरी या संकल्पनेची पुनर्मांडणी डेमी-फाईन ज्वेलरी करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. अमोल पटवारी, संस्थापक (पल्मोनाज)

New Age Gold ideal answer to saving fund : सणासुदीच्या किंवा लग्नसराईच्या निमित्ताने सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण काही प्रमाणात का होईना सोने खरेदी करण्यास पसंती देतात. बऱ्याचदा दागिन्यांच्या स्वरुपात ही खरेदी जाते. २४ कॅरट सोन्याचा सध्याचा दर ६३ हजाराच्या आसपास आहे. अशा काळात सोने खरेदीसोबत आपण पैशांची बचत करू शकतो हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे खरेदीच्या उत्साहात बचत करून आपला आनंद द्विगुणित कसा करायचा हे आता जाणून घेऊ.

सर्वसाधारणपणे सोने खरेदीवर लागणारा जीएसटी कर, दागिने तयार करण्यासाठी लावले जाणारे अतिरिक्त शुल्क किंवा 'घट' वजा करून जुने दागिने मोडून त्यात भर टाकून नवे दागिने करताना अशा कोणत्याही प्रक्रियेत आपण खर्च असलेल्या अतिरिक्त रकमेचा आपण विचारच करत नाही. त्यामुळे केवळ सोन्याचा दर पाहून आपण खरेदी करायला गेलो तर त्यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम आपण खर्चून येतो. ही प्रक्रिया जशी प्रत्यक्षातील (फिजिकल) सोन्याबाबतीत आहे तशीच काही प्रमाणात डिजिटल गोल्डबाबतीत आहे.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

'डिजिटल' असले तरी त्या सोन्याच्या खरेदी किंवा विक्रीच्या व्यवहारावेळी जीएसटी कर लागू होतच असतो. यावर एक उपाय म्हणजे साॅवरीन गोल्ड बाँड किंवा गोल्ड ईटीएफच्या स्वरुपात गुंतवणूक करणे. पण ही गुंतवणूक जरी केली तरी प्रत्यक्षात अंगावर सोनं घालण्याची हौस कशी भागणार?

सोन्याचे दागिनेही दररोज घालायचे आहेत, त्या दागिन्यांच्या सुरक्षिततेची काळजीही नको आहे आणि बचतही करायची आहे असा तिहेरी फायदा देणारा कोणता पर्याय आहे का? तर होय, असा पर्याय आहे आणि तो म्हणजे 'न्यू एज गोल्ड'चा. न्यू एज गोल्ड म्हणजे सोन्यासारखे दिसणारे, सोन्यासारखे वाटणारे मात्र प्रत्यक्षात सोन्याच्या किमतीपेक्षा कित्येक पटीने कमी किमतीत मिळणारी डेमी-फाईन गोल्ड ज्वेलरी.

परवडणाऱ्या दरात, उत्तमोत्तम डिझाईन्सची उपलब्धता आणि त्यामुळे कोणाच्याही व्यक्तिमत्वाला शोभून दिसेल अशी ही ज्वेलरी 'मिलेनियल्स' व 'जेन झी' म्हणजे सध्याच्या तरुण मुला-मुलींच्या पसंतीस उतरत आहे. मौल्यवान धातू किंवा खड्यांपेक्षा अगदी स्वस्त पण दीर्घकाळ वापरता येईल असे दागिने बनविण्यासाठी स्टर्लिंग सिल्व्हर याचा बेस मेटल म्हणून वापर करण्यात येतो व त्याच्यावर गोल्ड प्लेटिंग करून दागिने तयार केले जातात.

पारंपरिक गोल्ड ज्वेलरी व लक्झरी या संकल्पनेची पुनर्मांडणी डेमी-फाईन ज्वेलरी करत आहे. सोन्याचे दागिने आणि ते घडविणारे कारागिर यांचेही एक अतूट नाते आहे. स्टर्लिंग सिल्व्हरसारखे उच्चदर्जाचे साहित्य १४ कॅरट गोल्ड वर्माईल आणि प्रतिष्ठित खडे यांच्या वापरामुळे डेमीफाईन ज्वेलरीची लोकप्रियता वाढत आहे. ज्वेलरी इंडस्ट्रीला नवी दिशा देण्याचे काम डेमीफाईन ज्वेलरी करत आहे.

पारंपरिक शुद्ध सोन्याच्या ऐवजी नव्या पिढीचे स्वप्न आणि मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या या ट्रेंडची स्वीकार्हाता वाढली आहे. त्यामुळे दागिने घेताना डेमी-फाईन ज्वेलरीचे घेऊन उर्वरित पैसे हे साॅवरीन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड अशा स्वरुपातील गुंतवणुकीमध्ये टाकायचे असा न्यू-एज फंडा आता वापरला जात आहे.

डेमी-फाईन ज्वेलरीचे दागिने आपण दररोज निश्चिंतपणे वापरू शकतो. त्या दागिन्यांमुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. तसेच दैनंदिन वापरामुळे ते दागिने खराब होत नाहीत, तुटत नाहीत किंवा गोल्ड-प्लेटिंग निघून जात नाही. शिवाय, कोणत्याही कारणानिमित्त प्रवास करायचा झाल्यास अशा दागिन्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न तितका महत्त्वाचा राहात नाही. तसेच घरामध्येही हे दागिने सुरक्षित राहण्यात अडचण येत नाही. त्यामुळे बँक लाॅकरसारखा पर्याय निवडण्याची आवश्यकता भासत नाही. दैनंदिन वापरासाठी उत्तम, सुरक्षितता आणि उर्वरित रकमेच्या गुंतवणूक स्वरुपातील बचत असा तिहेरी फायदा करून देणारा हा न्यू-एज-गोल्ड फंडा आता लोकप्रिय ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: "कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा", निरोप समारंभात सरन्यायाधीश झाले भावूक

Ranji Trophy 2024-25: मुंबईची मोठ्या आघाडीमुळे विजयाकडे वाटचाल, तर दुसरीकडे ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरूवात

Fact Check : मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्री करा! 'मविआ'कडे संघटनांनी अट ठेवल्याचा 'तो' दावा खोटा

Mrinal Kulkarni : आईचं निधन.. पण शो मस्ट गो ऑन, मृणाल कुलकर्णी काही दिवसांतच कामावर रुजू

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

SCROLL FOR NEXT