new feature in the income tax portal will help you track notices, letters here's how  Sakal
Personal Finance

Income Tax: आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी सुरू केले नवीन फीचर; आता 'हे' काम होणार एका क्लिकवर

Income Tax Department: आयटीआर दाखल करताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आयकर विभागाने ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन फीचर सुरू केले आहे. हे फीचर करदात्यांना आयकर विभागाने जारी केलेल्या नोटिसा, पत्रे आणि सूचनांचा मागोवा घेण्यास मदत करेल.

राहुल शेळके

Income Tax Department: आयटीआर दाखल करताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आयकर विभागाने ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन फीचर सुरू केले आहे. हे फीचर करदात्यांना आयकर विभागाने जारी केलेल्या नोटिसा, पत्रे आणि सूचनांचा मागोवा घेण्यास मदत करेल.

यावर क्लिक करून, करदात्याला सर्व प्रलंबित कर नोटिसा एकाच ठिकाणी ट्रॅक करणे सोपे होईल. प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या या सुविधेमुळे करदात्यांची मोठी सोय होणार आहे. यामुळे तुम्हाला आयकर कार्यालयात जाण्याची गरज नाही.

अशी आहे प्रक्रिया

करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. आता तुम्हाला लॉग इन करावे लागेल. आता डॅशबोर्डवरून तुम्ही 'पेंडिंग ॲक्शन्स' विभागात जाऊ शकता आणि येथून 'ई-प्रोसिडिंग्स' वर जाऊ शकता. या फीचरमुळे करदात्यांचा वेळ वाचणार असून नोटीसला उत्तर देणेही सोपे होणार आहे.

'Pending Actions' मध्ये मिळेल ही माहिती

  • कलम 245 अंतर्गत अधिसूचना

  • कलम 139 (9) अंतर्गत सदोष सूचना

  • कलम 154ची सुओ मोटो सुधारणा

  • इतर कोणत्याही आयकर प्राधिकरणाने जारी केलेली सूचना

कोणती कागदपत्रे लागतील?

हे नवीन फीचर वापरण्यासाठी, वापरकर्त्यांना ई-फायलिंग पोर्टलसाठी पॅन, आयडी आणि पासवर्ड आवश्यक असेल. काही प्रकरणांमध्ये, सक्रिय TAN नंबर देखील आवश्यक असू शकतो.

या नव्या फीचरमुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे त्यांचा वेळ तर वाचेलच पण त्यांना कर संबंधित माहितीचा मागोवा घेणे आणि उत्तर देणे सोपे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT