New Income-Tax Regime Sakal
Personal Finance

New Tax Regime: नव्या कर प्रणालीमुळे सरकारी योजनांना बसलाय मोठा फटका; मध्यमवर्गाने फिरवली पाठ

राहुल शेळके

Small avings Schemes: जवळपास 70 टक्के करदात्यांनी नवीन आयकर प्रणालीकडे वाटचाल केल्याने, सरकारच्या लहान बचत योजनांमधील संकलन कमी झाले आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या मोठ्या लहान बचत योजनांमध्ये जमा केलेल्या रकमेत आणि ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बहुतांश लोक नव्या करप्रणालीकडे वळत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे उपलब्ध नवीन आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान PPF मध्ये जमा केलेल्या रकमेत घट झाली आहे. ऑक्टोबर वगळता 11 महिन्यांत या खात्यांमध्ये कमी रक्कम जमा झाली आहे.

एप्रिल 2023, सप्टेंबर 2023 आणि जानेवारी 2024 मध्ये सर्वाधिक घट झाली आहे. एप्रिल 2023 मध्ये 58.52 टक्के, सप्टेंबर 2023 मध्ये 45.06 टक्के आणि जानेवारी 2024 मध्ये 42.06 टक्के घसरण झाली होती. सुकन्या समृद्धी खाते आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूकीचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

अल्पबचत योजनांच्या ग्राहकांची संख्या 40 कोटींहून अधिक आहे. या योजनांमधील गुंतवणुकीवर ग्राहकांना कर सवलती मिळतात. यामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), किसान विकास पत्र (KVP) आणि सुकन्या समृद्धी खाते यासारख्या 12 योजनांचा समावेश आहे. यापैकी सुकन्या समृद्धी, PPF आणि NSC वर देखील कर सूट उपलब्ध आहे.

EY चे वरिष्ठ सल्लागार सुधीर कपाडिया म्हणाले, गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडाकडे वळत आहे कारण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

आथिर्क वर्ष 2025 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, राष्ट्रीय अल्पबचत प्राप्तींचा अंदाज जुलैच्या पूर्ण अर्थसंकल्पात 50,000 कोटी रुपयांनी कमी करून 14.2 लाख कोटी रुपये करण्यात आला, जो अंतरिम अर्थसंकल्पात 14.77 लाख कोटी रुपये होता.

PPF साठी अंदाजपत्रकातही थोडीशी सुधारणा करण्यात आली आहे. पूर्ण अर्थसंकल्पात PPF प्राप्तीचा अंदाज कमी होऊन 1.77 लाख कोटी रुपये झाला तर अंतरिम अर्थसंकल्पात हा आकडा 1.79 लाख कोटी रुपये होता.

सरकारने जाहीर केले की ते जुलै ते सप्टेंबर 2024 दरम्यान लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणतेही बदल करणार नाहीत. सरकारच्या या निर्णयाचा स्पष्ट अर्थ असा आहे की, सध्याचे दर चालू तिमाहीतही कायम राहतील.

वित्त मंत्रालयाने 28 जून रोजी जारी केलेल्या अहवालात म्हटले होते, 'विविध लहान बचत योजनांवरील व्याजदर आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी कायम राहतील.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fireworks Accident: गणपती विसर्जनात फटाक्याची आतिषबाजीमुळे 11 महिला ढोलवादक जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर! मंडळावर कारवाईची मागणी

Pune Firing: खानापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू, गावात पोलिस बंदोबस्त वाढवला

On This Day: अफगाणिस्तानचा 'करामती' खान! राशिदने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही, तर IPL, BBL अन् CPL मध्येही घेतली हॅट्रिक

Latest Marathi News Updates : Apple चा iPhone 16 खरेदीसाठी मुंबईत 'ॲपल स्टोअर'च्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी

Palak Paneer Dosa: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार पालक पनीर डोसा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT