Nikesh Arora
Nikesh Arora  sakal
Personal Finance

Nikesh Arora : भारतीयांचा डंका! निकेश अरोरा सर्वाधिक वेतन घेणारे CEO ; नडेला, झुकेरबर्ग आणि पिचाई  यांनाही टाकले मागे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये कार्यरत असलेल्या आणि सर्वाधिक वेतन घेणाऱ्या दहा सीईओंमध्ये निकेश अरोरा या एकमेव भारतीय वंशाच्या नागरिकाचा समावेश आहे. निकेश अरोरा ‘पालो अल्टो नेटवर्क्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

‘सी-स्यूट कॉम्प’ या डेटा ॲनालिटिक्स कंपनीने जाहीर केलेल्या सर्वाधिक वेतन घेणाऱ्या सीईओंच्या यादीत अरोरा यांचा समावेश आहे. ‘सी-स्यूट कॉम्प’ने २०२३ मधील जाहीर वेतन आणि प्रत्यक्षात मिळालेले वेतन अशा दोन निकषांवर आधारित दोन याद्या जाहीर केल्या असून, यातील एकाही यादीत गुगलचे सीईओ आणि भारतीय वंशाचे नागरिक सुंदर पिचाई यांचे नाव नाही.

निकेश अरोरा यांचा मात्र दोन्ही याद्यांमध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये समावेश आहे. अरोरा यांना २०२३ मध्ये १५.१४ कोटी डॉलर वेतन जाहीर करण्यात आले होते. यानुसार सर्वाधिक कमाई करणाऱ्या सीईओंच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. तर प्रत्यक्षात त्यांना २६.६४ कोटी डॉलर मिळाले आहेत.

यानुसार तयार करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत ते दहाव्या क्रमाकांवर आहेत. प्रत्यक्षात मिळालेल्या कमाईच्या यादीत टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचा प्रथम क्रमांक लागतो. त्यांनी २०२३ मध्ये १.४ अब्ज डॉलरची कमाई केली. त्यांच्यानंतर एक अब्जाहून अधिक डॉलरची कमाई करणारे पॅलांटीर टेक्नॉलॉजीजचे अलेक्झांडर कार्प हे दुसरे व्यक्ती आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girish Mahajan Audio Clip : धनगर उपोषणकर्त्यांबद्दल गिरीश महाजन काय म्हणाले? रमेश कराड यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल...

Panchavati Express : मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने गाडीला विलंब

Basket Bridge Case : 'तुम्हाला नितीन गडकरींचा अपमान करायचा आहे का?' असं का म्हणाले धनंजय महाडिक?

Hathras Stampede : २४ आश्रम, ५० गाड्यांचा ताफा अन् १०० कोटींची...; भोले बाबाकडे किती संपत्ती?

Maharashtra Live News Updates : जम्मू आणि काश्मिरमध्ये लष्कराच्या छावणीजवळ गोळीबार

SCROLL FOR NEXT