Why Indian Common People Hate Rich People? - Nithin Kamath: स्टॉक ब्रोकिंग कंपनी झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांना प्रश्न विचारला होता की, भारतीय लोक श्रीमंत लोकांचा द्वेष का करतात? याला उत्तर देताना उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी अतिशय गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपले मत व्यक्त केले आहे.
Zerodha CEO नितीन कामत यांना अलीकडेच YourStory च्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात हा प्रश्न विचारला होता. श्रद्धा शर्माने नितीन कामत यांना प्रश्न विचारला होता की, अमेरिकेत जर कोणी खूप पैसे कमावत असेल, जर तो खूप यशस्वी असेल आणि नवीन गाड्या विकत घेत असेल तर त्याचा फोटो कव्हर पेजवर छापला जातो. पण भारतात तसे होत नाही.
याला कामत यांनी उत्तर दिले की, अमेरिका हा शुद्ध भांडवलशाही समाज आहे. आपण भांडवलदार म्हणून मुखवटा घातलेला समाजवादी समाज आहोत. ते म्हणाले, आपण सर्व समाजवादी आहोत.
गोयंका यांनी झिरोधाच्या सीईओच्या चर्चेचे फुटेज शेअर करून आपले मत व्यक्त केले. त्यांनी लिहिले, हा माझा दृष्टीकोन आहे: भारतीय लोक रतन टाटा, अझीम प्रेमजी आणि आनंद महिंद्रा यांसारखे चांगल्या अब्जाधीशांचे स्वागत करतात - ते त्यांच्या नम्रता, परोपकार आणि मूल्यांवर प्रेम करतात आणि त्यांचे अनुकरण करतात.
त्यांनी त्यांच्या उत्तरात पुढे लिहिले की, जे लोक संपत्तीचा दिखावा करतात, व्यवस्थेला भ्रष्ट करतात आणि सामाजिक हितापेक्षा वैयक्तिक लाभाला प्राधान्य देतात ते लोकांना आवडत नाही. समस्या पैसा नाही तो कसा वापरला जातो ही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.