NLC India Limited IPO Sakal
Personal Finance

NLC India Limited IPO : एनएलसी इंडिया आणणार उपकंपनीचा आयपीओ, क्लीन एनर्जी बिझनेससाठी उभारणार फंड...

सकाळ वृत्तसेवा

एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC India Limited - NLCIL) तिच्या पूर्ण मालकीची उपकंपनी एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडचा (NLC India Renewables Limited) आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) प्रसन्न कुमार मोटुपल्ली यांनी ही माहिती दिली आहे.

लिग्नाईटपासून वीज उत्पादनापर्यंत व्यवसाय करणारी कंपनी पुढील आर्थिक वर्षाच्या (2025-26) पहिल्या तिमाहीत आयपीओ लाँच करण्याची योजना आखत असल्याचे ते म्हणाले. आपली अक्षय ऊर्जा क्षमता सध्याच्या 1.4 गीगाव्हॅटवरून 2030 पर्यंत 6 गीगाव्हॅटपर्यंत वाढवण्याची योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयपीओच्या माध्यमातून जमा होणारा निधी क्लीन एनर्जी एक्सपेन्शन प्लॅन अर्थात स्वच्छ ऊर्जा विस्तार योजनेत वापरला जाईल. यासाठी परदेशी कंपन्या आणि बँकांकडून सॉफ्ट लोनची व्यवस्था करण्याचाही कंपनीचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. एनएलसी इंडिया ही कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली नवरत्न कंपनी आहे. त्याचा मुख्य व्यवसाय खाणकाम आणि वीजनिर्मिती आहे.

एनएलसी इंडिया लिमिटेडची आजपर्यंतची विद्यमान मालमत्ता तिची उपकंपनी एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडकडे हस्तांतरित केली जाणार आहे. त्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी भारत सरकारकडून काही सूट आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू आहे.

येत्या ऑक्टोबरपर्यंत शासनाकडून मंजुरी मिळण्याची आशा आहे. कंपनी पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लिस्ट (IPO) होईल. या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने नवीन हरित ऊर्जा मालमत्तेसाठी एनएलसी इंडिया ग्रीन एनर्जी लिमिटेडची स्थापना केली आहे.

देशाच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी कन्व्हेंनशनल थर्मल आणि रिन्युएबल पॉवर जनरेशनमध्ये योग्य संतुलन आवश्यक आहे. त्यामुळेच कार्बन न्यूट्रल कंपनी NCL इंडिया लिमिटेड थर्मल आणि रिन्यूएबल एनर्जी स्पेसमध्ये क्षमता वाढवत आहे.

NLC India ही 6 GW कंपनी आहे ज्यामध्ये 1.4 GW रिन्युएबल कॅपिसिटी आणि 4.6 GW थर्मल कॅपिसिटी समाविष्ट आहे. एक गीगावाट रिन्यूएबल एनर्जी कॅपिसिटी जोडणारी देशातील पहिली कंपनी एनएलसी इंडियाने 2030 सालापर्यंत आपली उर्जा क्षमता 17 गीगाव्हॅट करण्याची योजना आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT