Swiggy CEO Rohit Kapoor: स्विगी फूड अँड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर यांनी अलीकडेच कर्मचाऱ्यांना 'वर्क लाइफ बॅलन्स' राखण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे सोशल मीडियावर खूप चर्चा चालू आहे. ते म्हणाले, की यशासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत, परंतु त्यासाठी आरोग्य आणि नात्यांचा त्याग करू नये.
बेंगळुरू येथे आयोजित टेकस्पार्क कार्यक्रमात आपले मत व्यक्त करताना कपूर म्हणाले की, अनेक उद्योगांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जात आहे, ज्याला हस्टल कल्चर म्हणून ओळखले जाते.
कपूर म्हणाले की, रात्री 3 वाजेपर्यंत काम करणे मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. त्यांनी सांगितले की, काम वेळेवर संपवणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे जास्त महत्त्वाचे आहे. यशासाठी वेडेपणाची गरज नसते. स्वत:चे उदाहरण देताना ते म्हणाले की, यश सहजासहजी मिळालेले नाही, पण त्यासाठी त्यांनी कोणताही वेडेपणा केला नाही.
या अगोदर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी कामाच्या तासांबद्दल वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. आता स्विगी फूडचे सीईओ रोहित कपूर यांच्या वक्तव्याचे कौतुक होत आहे.
बेंगळुरूमधील फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला SEBI कडून IPO साठी मंजूरी मिळाली आहे आणि यामुळे कंपनीच्या शेअर्सची मागणी वाढली आहे. आयपीओआधीही गेल्या 2 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
स्विगी शेअर्सची अनलिस्टेड मार्केटमध्ये खरेदी-विक्री होत असून लोक त्यात खरेदी-विक्रीही करत आहेत. एप्रिलमध्ये IPO ला भागधारकांनी मंजुरी दिल्यानंतर, अनलिस्टेड मार्केटमध्ये स्विगी शेअर्सना मोठी मागणी दिसून आली.
त्यामुळे शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 40% वाढ झाली आहे. पूर्वी कंपनीचे शेअर्स सुमारे 355 रुपयांवर होते, ते आता 490 रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत स्विगीचे बाजारमूल्य 70,000 कोटी रुपयांवरून 1.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.