hardeep singh puri Sakal
Personal Finance

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री?

Petrol-Diesel Price: पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्याच्या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले की, इंधनाच्या दरात कपात करण्याबाबत सरकारने अद्याप सरकारी तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा केलेली नाही.

राहुल शेळके

Petrol-Diesel Price: पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्याच्या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले की, इंधनाच्या दरात कपात करण्याबाबत सरकारने अद्याप सरकारी तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा केलेली नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात संभाव्य कपातीच्या वृत्ताला पेट्रोलियम मंत्र्यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ही बातमी पूर्णपणे अफवा असल्याचे म्हटले आहे. हरदीप सिंग पुरी म्हणाले की, सरकारची तेल विपणन कंपन्यांशी किंमती कमी करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास पेट्रोलियम मंत्री सध्या नकार देत असले तरी येत्या तीन महिन्यांत लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. सलग तिसर्‍यांदा मोदी सरकार सत्तेवर येण्यासाठी सरकार सर्व पावले उचलण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती या पातळीवर राहिल्या तर इंधनाच्या दरात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे आणि आपला देश जगातील एकमेव देश आहे जिथे पेट्रोलियम पदार्थ स्थिर आहेत. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे होत आहे. ते पुढे म्हणाले की, लाल सागरी मार्गामुळे अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, मात्र आम्ही सावध आहोत.

भारत व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करेल, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारतीय रिफायनरीज दक्षिण आफ्रिकेतील देशांतील तेलावर प्रक्रिया करण्यास सक्षम आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT